आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण:वरिष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले - 17 दिवस कोठडीत राहिल्यानंतर जामीन न मिळणे दुर्दैवी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • NCB ला पुराव्यांशी छेडछाड होण्याची भीती

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. पण वरिष्ठ क्रिमिनल लॉयर माजिद मेमन यांना आर्यनला आज जामीन मिळेल, अशी आशा होती. माध्यमांशी बोलताना मेमन म्हणाले, "त्याला जामीन मंजूर व्हायला हवा, यात दुमत नाही. एनडीपीएस कायद्यांतर्गत पार्टीच्या ठिकाणी त्याची उपस्थिती आणि बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन वगळता त्याच्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.'

NCB ला पुराव्यांशी छेडछाड होण्याची भीती
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आर्यन आणि अरबाज मर्चंटच्या फोनवर मिळालेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सवर आपले बहुतेक तर्क दिले आहेत. यावर, मेमन म्हणाले, "कथितरित्या चॅट संभाषण परिस्थितीला बिघडवत नाही कारण त्यासाठी कोणतीही पडताळणी किंवा वास्तविक समर्थन नाहीये. फिर्यादीला संशय आहे की तो एका शक्तिशाली कुटुंबातील आहे आणि पुराव्यांशी छेडछाड करू शकतो."

एनसीबीचे प्रकरण कमकुवत आहे
काही दिवसांपूर्वी अरबाज मर्चंटचे वकील तारक सईद यांनी खुलासा केला होता की, एनसीबीकडे खरं तर मजबूत केस नाही आणि सर्व काही आर्यन खान आणि अरबाज मर्चंटच्या फोनवरून मिळालेल्या व्हॉट्सअॅप चॅटवर आधारित आहे. सईद म्हणाले होते, "हे प्रकरण दोन आरोपींच्या मोबाईल फोनवरून मिळालेल्या व्हॉट्सअॅप चॅटवर आधारित आहे. पंचनाम्यात जप्तीचा उल्लेख नाही."

जामीनपात्र गुन्हा आहे
3 ऑक्टोबर रोजी दिलेल्या मुलाखतीत मेमन यांनी आर्यनला लवकरच जामीन मिळेल, असे भाकीत केले होते. ते म्हणाले होते, "असे दिसते की आर्यन सोबत सापडलेल्या ड्रग्जचे प्रमाण कमी आहे आणि ते व्यावसायिक वापरासाठी नाही. त्यामुळे गुन्हा जामीनपात्र असेल."

बातम्या आणखी आहेत...