आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगातच राहणार आर्यन:NDPS कोर्टाने आर्यनची न्यायालयीन कोठडी आणखी 7 दिवस वाढवली, पण जामिनाच्या सुनावणीवर परिणाम होणार नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने न्यायालयात मुदतवाढ मागितली होती.

क्रूझ शिप ड्रग प्रकरणात एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान आणि इतर सात जणांच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. मात्र, याचा मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जाच्या सुनावणीवर परिणाम होणार नाही. आर्यनची न्यायालयीन कोठडी 21 ऑक्टोबरपर्यंत होती, त्यानंतर एनसीबीने न्यायालयात मुदतवाढ मागितली होती.

उच्च न्यायालयात 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी
आर्यन खानला अजून उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सत्र न्यायालयाकडून आदेशाची प्रत मिळताच आर्यनच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळण्याविरोधात अपील दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण वेळ निघून गेल्यामुळे हे शक्य झाले नाही. यानंतर, आर्यनच्या वकिलांनी गुरुवारी सकाळी 10.30 वाजता पुन्हा जामीन याचिका दाखल केली. ही याचिका स्वीकारत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 26 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. तोपर्यंत आर्यनला आर्थर रोड तुरुंगातच राहावे लागेल.

आर्यनच्या वकिलांकडे आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे

NDPS कोर्टात आर्यनचा जामीन फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांकडे फक्त एक आठवडा शिल्लक आहे. या एका आठवड्यातच ते आर्यनला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. खरेतर 1 नोव्हेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. यानंतर, न्यायालय 14 नोव्हेंबरनंतरच उघडेल. अशा परिस्थितीत, आर्यनच्या बेलसाठी फक्त 7 वर्किंग डेज म्हणजेच एका आठवड्याचाच कालावधी आहे.

बातम्या आणखी आहेत...