आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने गेल्याच आठवड्यात DYavolX हा आपला लक्झरी कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे. स्वतः शाहरुखने या ब्रँडच्या पहिल्या कमर्शिअल जाहिरातीत अभिनय केला आहे. या ब्रँडचे कपडे 30 एप्रिलपासून ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शाहरुखचा ऑटोग्राफ असलेल्या जॅकेटचे कलेक्शन समोर येताच कंपनीची वेबसाइट क्रॅश झाली आहे. या जॅकेटची किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोटं घालाल. या जॅकेटची किंमत तब्बल 2 लाख रुपये आहे. एवढी किंमत असूनही काही मिनिटांतच जॅकेटची तुफान विक्री झाली आहे.
किंमत ऐकून चक्रावले लोक
गगनाला भिडलेल्या किमतीमुळे आता लोकांनी ट्विटरवर आर्यनला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या ब्रँडच्या टी-शर्टच्या किंमती 24 हजारांपासून ते 47 हजारांच्या घरात आहेत. या कपड्यांच्या किंमतीवरुन सोशल मीडियावर अनेकांनी आपली मते दिली आहेत. कपड्यांची किंमत पाहून लोकांनी ट्वीट केले की, 'फक्त आर्यन आणि शाहरुखचा ब्रँड आहे, याचा अर्थ टी-शर्टची किंमत 24 हजारांपासून सुरू व्हावी, असे नाही.'
काहींनी मीम शेअर करत लिहिले की, 'DyavolX वरील कपड्यांची किंमत पाहता, एखाद्याला आयफोन चोरावा लागेल असे दिसते.' एकाने लिहिले आहे - 'घरी बसून 400 रुपयांत 24 हजार किंमतीचे डायवोल्क्स जॅकेट कसे बनवायचे.' एकाने लिहिले आहे, '50 हजार किंमतीचे शर्ट आहे, यात मी आणि माझे संपूर्ण घर जाईन.' एकाने लिहिले, 'हे विकत घेण्यासाठी नुकतेच मी माझे घर विकले. यानंतर किडनी विकणार, तुमचा मोठा चाहता आहे.'
ब्रँडचा को-ओनर आहे आर्यन
आर्यनने मागील वर्षी बिझनेस जगतात आपले पहिले पाऊल टाकले आहे. आर्यनने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लेटी ब्लागोएवा आणि बंटी सिंग यांच्यासोबत मिळून D'YAVOL वोडका लाँच केला होता. आता याच पार्टनरसोबत मिळून त्याने कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे.
बिझनेसशिवाय आर्यन फिल्म मेकिंगमध्ये काम करत आहे
आर्यन खान लवकरच दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. त्याचा पहिल्या प्रोजेक्टची निर्मिती शाहरुख-गौरीच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट बॅनरखाली होणार आहे. याशिवाय आर्यन आयपीएल ऑक्शनचे आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे इव्हेंट सांभाळतो. यात सुहानाही त्याला मदत करते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.