आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्ज प्रकरण:आर्यन खानसोबत अटक झालेल्या अरबाज मर्चंटच्या वडिलांनी मौन सोडले, म्हणाले - सर्व आरोप निराधार आहेत आणि दोघेही निर्दोष आहेत

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अस्लम मर्चंट म्हणाले - काहीही सांगणे किंवा बोलणे घाईचे ठरेल

एनसीबीने शनिवारी गोव्याला जाणा-या क्रूझवर छापेमारीदरम्यान बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाज मर्चंटला ताब्यात घेतले. या प्रकरणात आता अरबाजचे वडील आणि अस्लम मर्चंट यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आर्यन आणि त्यांच्या मुलावर लावलण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत आणि ते दोघेही निर्दोष आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना अस्लम यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोबद्दल सांगितले. तपास यंत्रणा मुलांच्या बाबतीत खूप चांगली वागली आहे, असे ते म्हणाले. सोमवारी एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मुनमुन धामेचा यांची 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत केवळ 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

काहीही सांगणे किंवा बोलणे घाईचे ठरेल
मुलाखतीत अस्लम म्हणाले, "मुलांवरील सर्व आरोप निराधार आहेत. परंतु तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहे. या क्षणी काहीही बोलणे फार घाईचे आहे. एनसीबी खूप सहकार्य करत आहे आणि अधिकारी मुलांशी चांगले वागत आहेत. मी स्वतः वकील असल्याने माझा न्यायालयावर विश्वास आहे. सत्याचा विजय होईल आणि तो निर्दोष बाहेर येतील. ते दोघेही निर्दोष आहेत."

अरबाजकडे कथितरीत्या सापडलेल्या बेकायदेशीर ड्रग्जबाबत अस्लम म्हणाले, "ते क्रूझच्या आत सापडले, बाहेर नाही. त्यांनी क्रूझमध्ये प्रवेशही केला नव्हता. त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.'

ड्रग्ज संबंधित व्हॉट्सअॅप चॅट नाही
एनसीबीने सोमवारी न्यायालयाला सांगितले की, आर्यन आणि अन्य दोन आरोपींच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये धक्कादायक आणि आक्षेपार्ह मजकूर सापडला आहे. याबाबत बोलताना अस्लम म्हणाले, "ते ड्रग्जशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट नाहीत. खरं तर क्रूझवर जायला ते तयार नव्हते. या क्रूझवर जाण्यासाठी ते अगदी शेवटच्या क्षणी तयार झाले. त्यांना सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. अरबाजने माझ्याबरोबर नाश्ता केला होता आणि रात्रीचे जेवणही आम्ही सोबत करणार होतो."

माझ्या क्लायंटजवळ कोणते ड्रग्ज सापडले नाहीत
आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दावा केला की, माझ्या क्लायंटकडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाही आणि त्यांचे प्रकरण जामीनपात्र आहे. माझ्या क्लायंटला आयोजकांनी बोलावले होते. त्याच्याकडे क्रूझचे तिकीटही नव्हते. त्याच्याकडे काहीही सापडले नाही. याशिवाय त्याचा मोबाईल फोनही तपासण्यात आला आहे. त्यातही काही सापडले नाही. आर्यन व्यतिरिक्त अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतिजा, इश्मीत चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा, विक्रांत छोकर आणि दोन ड्रग पॅडलर देखील या प्रकरणात एनसीबीच्या ताब्यात आहेत.

बातम्या आणखी आहेत...