आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलासाठी चिंतित आहेत शाहरुख-गौरी:आर्यन खान आता खातोय तुरुंगातील अन्न, गौरीने मुलाच्या लवकर सुटकेसाठी केला नवस, गोड पदार्थ खाणे सोडले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यनने कारागृहात जाण्याआधी पाण्याच्या 12 बाटल्या विकत घेतल्या होत्या.

मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेल्यामुळे शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाची अत्यंत बिकट अवस्था जाली आहे. शाहरुखच्या घरी मन्नतमध्ये शांतता पसरली आहे आणि शाहरुख-गौरी फक्त आपल्या मुलासाठी प्रार्थना करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, गौरीने देवाकडे नवस केला आहे. 7 ऑक्टोबरला नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली, तेव्हापासून गौरीने गोड पदार्थ खाणे बंद केले असून आर्यन घरी परत येईपर्यंत ती गोड पदार्थांना हात लावणार नाहीये.

आर्यन आता खाऊ लागला आहे तुरुंगातील अन्न
रिपोर्ट्सनुसार, आर्यनला तुरुंगातील जेवण गोड लागत नसल्याने तो केवळ बिस्कीटं खाऊन आणि बाहेरून विकत घेतलेले पाणी यांच्यावरच गुजराण करत होती. आर्यनने कारागृहात जाण्याआधी पाण्याच्या 12 बाटल्या विकत घेतल्या होत्या. त्यातलेच पाणी तो पुरवून पुरवून वापरत होता. आता आर्यन तुरुंगातील जेवण जेऊ लागला आहे.

अलीकडेच शाहरुखने आर्यन खानला 4500 रुपयांची मनी ऑर्डर आली आहे. कारागृह प्राधिकरणाकडे ही मनी ऑर्डर पाठवावी लागते. हे पैसे आर्यनच्या कँटीनच्या खर्चासाठी कूपनच्या स्वरुपात दिले जातात. जेल मॅन्युअलनुसार, कोणत्याही कारागृहातील आरोपीला महिन्यातून एकदा मनीऑर्डर मिळू शकते, जी साडेचार हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. आर्यन तुरुंगात अतिशय अस्वस्थ आहे.

सामान्य बॅरेकमध्ये शिफ्ट झाला आर्यन

गुरुवारी, आर्यन खानसह इतर पाच आरोपींना क्वारंटाईन सेलमधून कॉमन सेलमध्ये हलवण्यात आले आहे. आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचल म्हणाले की, आर्यनला घरचे जेवण दिले जात नाही. त्याला आता नियमानुसार सामान्य बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे.

20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहणार आर्यन
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला अजून सहा दिवस तुरुंगातच घालवावे लागणार आहेत. न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत आर्यनच्या जामीन अर्जावरील निर्णय राखीव ठेवला आहे. आर्यनसोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीचा हे देखील 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार.

बातम्या आणखी आहेत...