आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन ड्रग्ज प्रकरण:आर्यन खानने व्हिडिओ कॉलद्वारे शाहरुख-गौरीशी साधला संवाद, मुलाला पाहून आईवडिलांना अश्रू अनावर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई विशेष न्यायालयाने आर्यनच्या जामीन अर्जावरील निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा क्रूझ ड्रग प्रकरणात सापडल्यानंतर सध्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. आर्यन आता इतर आरोपींसह तुरुंगात राहात असून तेथील अन्न खात आहे. अटक झाल्यानंतर जवळपास 12 दिवसांनंतर आर्यनने आई गौरी आणि वडील शाहरुख यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. आर्यनला पाहून गौरी आणि शाहरुखला अश्रू अनावर झाले आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने तुरुंग अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे, ‘आर्यनने त्याच्या आईचा फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर आर्यनने आई आणि वडिलांना व्हिडिओ कॉल केला होता. जवळपास 10 मिनिटे त्यांच्यामध्ये संवाद झाला. दरम्यान आर्यनला पाहून गौरी खानला रडू कोसळले आहे.’ मुंबई विशेष न्यायालयाने आर्यनच्या जामीन अर्जावरील निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे.

आई -वडिलांशी बोलल्यानंतर आर्यन भावूक झाला
रिपोर्ट्सनुसार, आर्यन खानने शुक्रवारी गौरी-शाहरुखसोबत 10 मिनिटे संवाद सांधला. अनेक दिवसांनंतर आर्यन खान पालकांशी बोलल्यानंतर खूप भावूक झाला होता. आईवडिलांसोबत बोलण्यासाठी आर्यन खानने स्वतः त्याच्या आईचा नंबर अधिकाऱ्यांना दिला होता.

न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर झाले बोलणे

जेल प्रशासनाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने सर्व कैद्यांना आठवड्यातून एकदा मोबाईलद्वारे कुटुंबातील सदस्यांशी किंवा त्यांच्या वकिलांशी बोलण्याची परवानगी दिली आहे. कोविडमुळे कोणत्याही आरोपीला तुरुंगात नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही, यामुळे न्यायालयाने त्यांना व्हिडिओ कॉल करण्याचे आदेश दिले आहेत.

शाहरुख- गौरीने आर्यनसाठी मनीऑर्डर पाठवली
11 ऑक्टोबर रोजी शाहरुख खान आणि गौरी यांनी मुलगा आर्यनसाठी 4500 रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे. एका कैद्याला जेलमध्ये एवढीच रक्कम ठेवण्याची परवानगी आहे. हे पैसे आर्यनच्या कँटीनच्या खर्चासाठी कूपनच्या स्वरुपात दिले जातात. जेल मॅन्युअलनुसार, कोणत्याही कारागृहातील आरोपीला महिन्यातून एकदा मनीऑर्डर मिळू शकते, जी साडेचार हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला अजून सहा दिवस तुरुंगातच घालवावे लागणार आहेत. न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत आर्यनच्या जामीन अर्जावरील निर्णय राखीव ठेवला आहे. आर्यनसोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीचा हे देखील 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार. आर्यनला आता तुरुंगात क्रमांक 956चा बॅच मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...