आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण:आर्यनच्या अटकेनंतर चाहत्यांनी शाहरुख खानला पाठिंबा दर्शविला, #WeStandWithSRK ट्विटरवर होतंय ट्रेंड

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यनविरुद्ध मादक पदार्थांचे सेवन, विक्री, खरेदी, वाहतूक करणे, ते पदार्थ बाळगणे इत्यादी कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

क्रूझवर रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक केली. आर्यनचा मित्र अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही चौकशीनंतर अटक करण्यात आली. आर्यनने चौकशीत आपण ड्रगचे सेवन केल्याचे कबूल केले आहे, मात्र ड्रग्ज खरेदी केल्याचा इन्कार केला. चौकशीतून या पार्टीची संपूर्ण माहिती मिळवण्याचा एनसीबीचा उद्देश आहे. आर्यनकडून एमडीएमएच्या 22 गोळ्या, 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी आणि 1.33 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. ड्रग्ज खरेदी व विक्रीचाही आर्यनवर आरोप आहे. तपास आणि न्यायालयीन कारवाई दरम्यान, शाहरुखच्या चाहत्यांनी ट्विटरवर #WeStandWithSRK ट्रेंड करून अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शविला आहे.

चाहत्यांनी शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दिला

आर्यनच्या अटकेनंतर नेटिझन्स किंग खानच्या कुटुंबाला आणि त्याचा मुलगा आर्यन खानला पाठिंबा दर्शवण्यासाठी ट्विटरचा आधार घेत आहेत. #WeStandWithSRK लिहून ते आपला पाठिंबा दर्शवत आहेत. ट्विटरवर एका चाहत्याने लिहिले की, "#WeStandWithSRK #SRKPRIDEOFINDIA आम्ही सर्व शाहरुख सर आणि त्यांच्या सुंदर कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. #ShahRukhKhan." आणखी एका चाहत्याने ट्विट केले, "मी तुझ्या पाठीशी आहे शाहरुख खान.. नेहमी आणि नेहमीच. शाहरुख आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. #WeStandWithSRK."

शनिवारी ही कारवाई झाली होती. यात एमडीएमए, कोकेन, मेपेड्रॉन (एमडी), चरण, एमलएसडी, हशीशसारखे पदार्थ जप्त करण्यात आले. कोकेन दिल्लीतील एका ड्रग्ज पुरवणाऱ्यानेच दिले होते, तर एलएसडी ऑनलाइन खरेदी करण्यात आले.

दिल्लीतील ड्रग पेडलरचे नाव समोर येताच त्याला पकडण्यासाठी पथक रवाना झाले. एनसीबीचे प्रमुख एस. एन. प्रधान म्हणाले, गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यात बॉलीवूडच्या काहींचे धागेदोरे असू शकतात. आर्यनविरुद्ध मादक पदार्थांचे सेवन, विक्री, खरेदी, वाहतूक करणे, ते पदार्थ बाळगणे इत्यादी कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सहा महिने ते एक वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.

तेव्हा चेष्टेत शाहरुख म्हणाला होता : ‘माझ्या मुलास ड्रग्जचाही अनुभव हवा’
सुमारे 24 वर्षांपूर्वी 1997मध्ये शाहरुख खान आणि गौरी खान सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा शाहरुख चेष्टेत म्हणाला होता, “माझ्या मुलालाही ड्रग्जचा अनुभव असायला हवा. मी जे तारुण्यात करू शकलो नाही ती सर्व वाईट कामे त्याने करावीत. मुलींना डेट करायला हवे, ड्रग्जचाही आनंद लुटायला हवा.’

बातम्या आणखी आहेत...