आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Aryan's Eyes Were Seen In Arthur Road Jail, Ate Biscuits With Water, Only Drank Jail Tea On The First Day, Giving His Food To Another Prisoner

भास्कर तपास:आर्थर रोड तुरुंगातील आर्यनचा आंखो देखा हाल; पाण्यात बुडवून बिस्किटे खातो, फक्त पहिल्या दिवशी तुरुंगातील चहा पिला

राजेश गाबा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुरुंगात जेवण वाढणा-या श्रवणने सांगितली आर्यनची तुरुंगातील दिनचर्या
  • तुरुंगातील कँटीनमधून विकत घेतलेले चिप्स, बिस्किट खातो. पाणीही विकतच घेतो.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगातील जेवण खात नाहीये. त्याने फक्त पहिल्याच दिवशी तुरुंगातील चहा पिला होता. त्या दिवसापासून त्याने तुरुंगातील खाण्याचा कुठल्याही पदार्थाला स्पर्श केलेला नाही. आर्यन तुरुंगात मिळणारे जेवण खात नाही, ते तो इतर कैद्यांना देतो आणि स्वतःमध्येच मग्न असतो.

16 ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटका झालेला कैदी श्रवण नडार याने या सर्व गोष्टी दैनिक भास्करला सांगितल्या आहेत. फसवणुकीच्या प्रकरणात नडार सहा महिने आर्थर रोड तुरुंगात होता. सोमवारीच त्याची तुरुंगातून सुटका झाली. श्रवण त्याच बॅरकमध्ये होता जिथे आर्यनला ठेवले आहे.

आर्यनच्या बॅरेकमध्ये असलेल्या कैद्यांना जेवण देणे हे श्रवणचे तुरुंगातील काम होते. आर्यन खान मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या जामिनावरील सुनावणी 20 ऑक्टोबरला होणार आहे.

एका बॅरेकमध्ये 4 सेल, प्रत्येक सेलमध्ये 100 लोक
श्रवणने सांगितले की, आर्यन आणि त्याच्या साथीदारांना एका आठवड्यासाठी क्वारंटाइन ठेवल्यानंतर 1 नंबर बॅरेकमध्ये आणले गेले. एका बॅरेकमध्ये 4 सेल आणि एका सेलमध्ये 100 कैदी असतात. म्हणजेच 4 सेलमध्ये 400 कैदी आहेत. प्रत्येकजण एकमेकांच्या शेजारी झोपतो. हलायलाही तिथे जागा नसते. एका सेलमध्ये 4 स्वच्छतागृहे आहेत. यात एक वेस्टर्न आणि 3 इंडियन आहेत. आर्यनच्या सेलमध्येही 100 कैदीही आहेत, तिथे 10 पंखे आहेत.

आर्यन आपले जेवण इतर कैद्यांना देतो
श्रवणने सांगितले की आर्यनने पहिल्याच दिवशी जेलचा चहा प्यायला होता. मी तो त्याला दिला होता. त्याशिवाय त्याने काहीही खाल्ले नाही. तो कँटीनमधून बिस्किटे, चिप्स मागवतो. बिस्किट पाण्यात बुडवून खातो. मी अनेक वेळा पाहिले आहे. बाटलीबंद पाणी पितो.

श्रवण पुढे म्हणाला की, तुरुंगाच्या नियमानुसार, 'हक का भत्ता' (एखाद्याच्या जेवणाचा वाटा) घ्यावा लागतो. आर्यन त्याचे जेवण घेतो, पण तो इतर कैद्यांना देतो. तो काहीही खात नाही. अनेक वेळा मी आणि तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याला विचारले, पण तो फक्त म्हणतो की मन नाहीये, भूक नाहीये. तो एकटाच शांत बसलेला असतो. कोणाशीही बोलत नाही.

घरुन आलेले कपडे घालतो
श्रवणने सांगितले की, आर्यन त्याच्या घरुन आलेले टी-शर्ट आणि जीन्स घालतो. त्याला कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत नाही. मी परवा जेव्हा येत होतो, तेव्हा त्याला मनीऑर्डरद्वारे 4500 रुपये मिळाले होते. त्या पैशातून त्याने चिप्स आणि पाण्याच्या 5 डझन बाटल्या घेतल्या होत्या. मी आर्यनशी बोललो, तो फक्त म्हणाला - तुमचे अभिनंदन, तुम्ही बाहेर जात आहात. मी त्याला सांगितले की तूही लवकरच येशील, देवावर विश्वास ठेव.

तुरुंगात केस कापले, दाढी केली
कारागृहातून सुटलेल्या श्रवणने सांगितले की, कारागृहात आल्यानंतर आर्यन खूप घाबरलेला होता. टेंशनमध्ये होता. त्याचे केस कापले गेले, नंतर शेव्हिंग करण्यात आले. तो टीव्ही पाहत नाही किंवा तुरुंगात कोणाशी बोलत नाही.

हा आहे आर्यन खानचा तुरुंगातील दिनक्रम
श्रवणने सांगितले की, सकाळी 6 वाजता शिट्टी वाजते. कैदी मोजले जातात. त्यानंतर आर्यन हात आणि चेहरा धुवून नाश्ता घ्यायला येतो. न्याहारीमध्ये शीरा, पोहे आणि चहा असतो. आर्यन ते दुसऱ्या कैद्यांना देतो.

10 वाजता जेवण दिले जाते. जेवणात 2 पोळ्या, डाळ आणि भाजी असते. आर्यन ते जेवणही इतरांना देतो. त्यानंतर तो विश्रांतीसाठी जातो. दुपारी 3 वाजता चहा दिला जातो. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता जेवण दिले जाते. 6 वाजता पुन्हा सर्व कैद्यांची गणना केली जाते. मग प्रत्येकजण आपापल्या बॅरेकमध्ये परततो. आर्यन शांत बसलेला असतो, किंवा झोपलेला असतो.

बातम्या आणखी आहेत...