आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता मनोज बाजपेयीचा आगामी चित्रपट 'सिर्फ एक बंदा काफी है'चा ट्रेलर 8 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. पण आता हा कोर्टरूम ड्रामा कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे. आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.
ट्रस्टच्या वकिलांनी चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशनवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. नोटीस जारी करताना बापूच्या वकिलाने म्हटले की, हा चित्रपट आक्षेपार्ह आणि त्याच्या अशिलाची बदनामी करणारा आहे, त्यामुळे त्याची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. तसेच त्याच्या भक्तांच्या आणि अनुयायांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.
चित्रपटाची कथा आसाराम बापूच्या आयुष्याशी निगडीत असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. या चित्रपटात अशा एका उच्च न्यायालयातील वकिलाची भूमिका दाखवण्यात आली आहे ज्याने POCSO कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा खटला एकट्याने लढवला. चित्रपटात मनोज बाजपेयी त्या वकिलाच्या मुख्य भूमिकेत आहे.
या चित्रपटातील गॉडमॅन दुसरा कोणी नसून आसाराम बापू आहे आणि चित्रपटातील मनोजच्या पात्राचे नाव पीसी सोलंकी आहे. विशेष म्हणजे याच नावाच्या वकिलांनी आसाराम बापू विरोधात खटला लढवला होता. हा चित्रपट 23 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE 5 वर प्रदर्शित होणार आहे.
आम्ही चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत - निर्माते
प्रॅक्टिकल प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'सिर्फ एक बंदा काफी है'ची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते आसिफ शेख यांनी नोटीस मिळाल्याची पुष्टी केली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'होय, आम्हाला नोटीस मिळाली आहे आणि आमचे वकील पुढील कारवाईचा निर्णय घेतील. आम्ही पीसी सोलंकी यांच्यावर बायोपिक बनवला असून हा चित्रपट बनवण्याचे अधिकार मी त्यांच्याकडून विकत घेतले होते. आता कोणी म्हणत असेल की आम्ही त्यांच्या बापूवर चित्रपट बनला आहे, तर मग त्यांनीच विचार करावा.'
कोण आहेत पीसी सोलंकी?
हा चित्रपट आसारामविरोधात खटला लढणारे वकील पी सी सोलंकी यांच्यावर आधारित आहे. मनोज बाजपेयीने या चित्रपटात त्यांची भूमिका साकारली आहे. पी सी सोलंकी यांचे पूर्ण नाव पूनम चंद सोलंकी आहे. आसाराम प्रकरणात बलात्कार पीडितेच्या बाजूने पी सी सोलंकी यांनी खटला लढला होता. सोलंकी यांनी ही केस तर लढवलीच पण त्या मुलीला न्यायही मिळवून दिला.
यादरम्यान त्यांना केस सोडण्याची लालूच आणि धमक्याही आल्या, मात्र त्यांनी त्याची पर्वा केली नाही. त्यामुळेच आज आसाराम तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आसारामच्या वतीने देशातील नामवंत आणि दिग्गज वकिलांनी बाजू मांडली. या वकिलांच्या समोर पी सी सोलंकी यांनी अत्यंत हुशारीने पीडितेची बाजू मांडली आणि कोणतीही भीती न बाळगता खटला निकाली काढला.
फी न घेता केस लढवली
2014 मध्ये पी सी सोलंकी या खटल्यात सहभागी झाले होते. तेव्हापासून ते हा खटला लढत होते. सोलंकी यांनी या खटल्यासाठी त्यांची फी घेतली नाही. उलट ते स्वखर्चाने दिल्ली व इतर ठिकाणी जात असत.
खटल्यातून माघार घेण्यासाठी त्यांना विविध प्रलोभने देण्यात आली. केस सोडली नाही तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या, मात्र त्यांनी खचून न जाता खटला लढला.
आसाराम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे
आसारामचे गुन्हे 2013 मध्ये पहिल्यांदा उघडकीस आले होते. ऑगस्ट 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीने आसारामवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आसारामने आपल्या मुलीवरील भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिच्या पालकांचा आहे.
पीडित मुलगी 15 ऑगस्ट 2013 रोजी आसारामच्या जोधपूर आश्रमात गेली होती. त्याच दिवशी आसारामने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. 20 ऑगस्ट 2013 रोजी पीडितेच्या पालकांनी एफआयआर दाखल केला. पाच वर्षांनंतर एप्रिल 2018 मध्ये जोधपूर न्यायालयात आसारामला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.