आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री आशा नेगी पुन्हा एकदा अल्ट बालाजीची गाजलेली वेब सीरिज 'बारिश 2' मध्ये दिसणार आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर आशा दुसर्या भागात प्रेक्षकांना अचंबित करणार आहे. ती प्रथमच ऑन-स्क्रीन किसिंग सीन करत आहे. यापूर्वी तिच्या आणि अभिनेता ऋत्विक धनजानीच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या. अलीकडेच दैनिक भास्करशी झालेल्या चर्चेदरम्यान आशाने सांगितले की, शर्मन जोशीसह पावसात किसींग सीन देण्याचे दृश्य तिच्यासाठी खूप अवघड होते. या बातचीतदरम्यान आशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळले.
पहिल्या यशस्वी सीझननंतर 6 मेपासून 'बारिश 2' ही वेब सीरिज अल्ट बालाजी अॅपवर स्ट्रीम करण्यात आली आहे. 2019 मध्ये त्याचा पहिला सीझन आला होता. पहिल्या सीझनप्रमाणेच दुस-या भागातही शर्मन जोशी आणि आशा नेगी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत.
टीझर फॉरवर्ड करायला लाज वाटली होती : टीझर रिलीज झाला तेव्हा त्यात काही किसिंग सीन आले होते, तेव्हा आईवडिलांना टीझर फॉरवर्ड करण्यात खूप लाज वाटली. बराच विचार करून मी टीझर आणि ट्रेलर पाठवला. सहसा ते लवकरच प्रतिक्रिया देतात परंतु यावेळी ते अजिबात बोलले नाहीत, हो पण माझ्या कुटुंबातील इतर लोक मात्र मला चिडवत होते, असे आशाने सांगितले.
किसिंग सीन करण्यात अडचण आली : पहिल्या ऑन-स्क्रीन किसिंगचा अनुभव सांगताना आशा म्हणाली, टीमने इतक्या साध्या पद्धतीने असे सीन शूट केले आहेत. होय, परंतु खरंच किसींग सीन देणे माझ्यासाठी थोडे ऑकवर्ड नक्कीच होते (हसून). माझे सहकलाकार शरमन जोशी यांना किसिंग सीन्सचा खूप अनुभव आहे, त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केले. सीन करतानाच ठरवले होते की, जास्त टेक देणार नाही, नाहीतर मला पुन्हा किस करावे लागेल. हा माझा ऑन स्क्रीनवरील पहिला किसींग सीन होता, जो सुरुवातीला शूट करणे खूप कठीण होते.
अपयश आणि नैराश्याचा मी सामना केला आहे : मी दोन शो केले होते जे एक-दोन महिन्यांतच बंद झाले होते. जेव्हा मी ते अपयश पाहिले तेव्हा मी खूप उदास व निराश झाले होते. त्यानंतर मी घाईत काम न करण्याचा निर्णय घेतला. मला जोवर इंट्रेस्टिंग प्रोजेक्ट मिळणार नाही, तोपर्यंत मी टेलिव्हिजन शो करणार नाही, असे मी ठरवले आहे. मी एकदा अपयश आणि नैराश्याने ग्रस्त झाले होते, आता मला पुन्हा त्याकडे वळायचे नाही.
मला स्वतःला पडद्यावर 'लेडी जेम्स बाँड'च्या भूमिकेत पाहायचे आहे: पुढे जाऊन काही स्त्री प्रधान प्रोजेक्ट्सचा मला भाग व्हायचं आहे, ज्यात माझ्या हातात एक पिस्तूल असेल आणि मला काही अॅक्शन सीन्स करण्याची संधी मिळेल. मला स्वत: ला पडद्यावर 'लेडी जेम्स बाँड' च्या भूमिकेत पाहायचे आहे. मला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काहीतरी वेगळे करायचे आहे.
ऋत्विक धनजानी आणि तुझ्या ब्रेकअपची चर्चा आहे: काही दिवसांपूर्वी ऋत्विक आणि आशा यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होते. जेव्हा आशाला ऋत्विकसोबतच्या नात्याविषयी विचारणा झाली, तेव्हा मात्र तिने याचे उत्तर देण्यास नकार दिला. ती म्हणाला, मला वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करायचं नाही, सॉरी.
कुटुंबाला अफवांचा सामना करावा लागतो : जेव्हा जेव्हा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बातम्या माध्यमांमध्ये येतात तेव्हा त्यास सामोरे जाणे फार कठीण असते. माझ्या कुटुंबाचा याचा माझ्यापेक्षा जास्त त्रास होतो. या इंडस्ट्रीचा एक भाग बनून, आम्ही स्ट्राँग बनतो, मात्र कुटुंबातील सदस्यांना याला सामोरे जाणे अवघड असते. पण आता हळूहळू त्यांना समजले आहे की त्यांची मुलगी एक अभिनेत्री आहे आणि अशा बातम्या येतच राहणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.