आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशा पारेख यांचा वाढदिवस:विवाहित नासिर हुसैन यांच्यावर होते आशा पारेख यांचे प्रेम, 'या' कारणामुळे होऊ शकले नाही लग्न; म्हणाल्या होत्या - 'देवाने माझी  जोडी बनवली नाही'

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशा पारेख यांनी आयुष्यभर लग्न केले नाही.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 79 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 ऑक्टोबर 1942 रोजी जन्मलेल्या आशा पारेख यांच्या सौंदर्याचे किस्से आजही सांगितले जातात. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. खासगी आयुष्यात आशा पारेख आयुष्यभर अविवाहित राहिल्या. खरं तर चित्रपट दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या प्रेमात त्या पडल्या होत्या. बराच काळ हे दोघे रिलेशनमध्ये होते, मात्र त्यांचे हे नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही. याचा खुलासा स्वतः आशा पारेख यांनी केला होता.

नासिर हुसैन सोबत आशा पारेख
नासिर हुसैन सोबत आशा पारेख

आशा यांनी नासिर हुसैन यांच्या 'दिल देके देखो', 'तिसरी मंजिल' आणि 'कारवां' सह 7 चित्रपटांमध्ये काम केले. आशा पारेख यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी 'द हिट गर्ल'मध्ये खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. त्या म्हणाल्या होत्या, 'या आत्मचरित्रामध्ये मी नासिरला जागा देत आहे कारण तो एकमेव पुरुष होता ज्याच्यावर मी आयुष्यभर प्रेम केले.'

ऑटोबायोग्राफीच्या लाँचिंगवेळी त्या म्हणाल्या होत्या, कदाचित देवाने माझी जोडी बनवलीच नाहीये आणि मी ज्या माणसावर मनापासून प्रेम करते तो माणूस जर आयुष्यात नसेल तर मग दुसऱ्या कोणासोबत लग्न करणे मला पटत नाही.

नासिर हे विवाहित आणि दोन मुलांचे वडील होते. त्यांचा उल्लेख त्यांनी 'द हिट गर्ल' या पुस्तकात केला होता. ही ऑटोबायोग्राफी खालिद मोहम्मद यांनी लिहिली होती, 2017 मध्ये ती पब्लिश झाली होती.

खरं तर आशा पारेख या नासिर यांच्याशी लग्न करून त्यांची दुसरी बायको म्हणून राहू शकल्या असत्या. पण असे करणे म्हणजे स्वत:चेच चारित्र्यहनन करून घेण्यासारखे आहे, याची जाणिव त्यांना होती. लोकांनी त्यांना संसार तोडणारी स्त्री असे म्हटले असते. म्हणूनच त्या नासिर यांच्यापासून दूर गेल्या.

आशा यांच्या आईला त्यांनी लग्न करावे असे वाटत होते. आशा पारेख यांना खूप स्थळे आली पण प्रत्येक वेळी त्यांनीच काही ना काही कारण सांगून टाळाटाळ केली. जर आपल्याला हवा असलेला जोडीदार मिळाला नाही तर आपण दुसऱ्या कोणासोबत खुश राहू शकत नाही. यामुळे आपण त्या दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य सुद्धा उध्वस्त करू शकतो, असे आशा यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...