आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गंगेत अस्थी विसर्जन:वडिलांनी थरथरत्या हातांनी केले सुशांतच्या अस्थींचे विजर्सन, याच ठिकाणी झाले होते आईवर अंत्यसंस्कार 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत अंत्यसंस्कार झाल्यानंतर सुशांतचे कुटुंबीय पाटण्याला परतले आहेत.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अस्थींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. पाटण्यातील दीघा येथील 92 नंबर घाटावर त्याचे वडील के.के. सिंह यांनी थरथरत्या हातांनी आपल्या मुलाच्या अस्थी विसर्जित केल्या. यावेळी सुशांतची थोरली बहीण श्वेता, वहिनी आणि कुटुंबातील काही सदस्य हजर होते. कुटुंबीयांना सांगितल्यानुसार, सुशांतची आई उषा सिंह यांच्यावरदीघाच्या 92 नंबर घाटावरच अंत्यसंस्कार करण्यात आलेहोते. यामुळे त्याच्या अस्थिदेखील येथेच आणण्यात आल्या.  

कुुटंबाशी निगडीत सूत्रांनी सांगितल्यानुसार, सुशांतचे श्राद्धकर्म  पाटण्यातील त्याच्या राजीवनगर स्थित घरी होणार आहे. यात त्याचे वडिलोपार्जित गाव पूर्णियातून नातेवाईक सहभागी होतील. मुंबईतील विले पार्ले स्थित पवनहंस स्मशानभूमीत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या अस्थी घेऊन त्याचे वडील पाटण्याला परतले होते.

0