आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांचे मुलाला हटके गिफ्ट:'शार्क टँक'चा एक्स जज अश्नीर ग्रोव्हर मुलाचा निकाल लागल्यावर त्याला घेऊन गेला चक्क हाय कोर्टात

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या पर्वाचा शार्क अश्नीर ग्रोव्हर कायमच चर्चेत असतो. आता अश्नीर शार्ट टँक इंडियाच्या दुसऱ्या पर्वाचा भाग नाही, पण तरीही सोशल मीडियावर तो सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या अश्नीर त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. नुकताच अश्नीरच्या मुलाचा निकाल लागला. मुलगा परीक्षा पास झाल्यानंतर अश्नीर चक्क त्याला उच्च न्यायालयात घेऊन गेला.

मुलाला उच्च न्यायालयात घेऊन गेला अश्नीर
अश्नीर ग्रोव्हरने त्याच्या मुलाबद्दलचे एक ट्वीट केले आहे. मुलगा परीक्षा पास झाल्यावर अश्नीर त्याला हाय कोर्टात घेऊन गेला. त्याने स्वतःच ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. त्याने मुलाबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. "तुमचा मुलगा पास होऊन पुढच्या वर्गात जातो तेव्हा तुम्ही त्याला कुठे घेऊन जाता? मी त्याला सर्वात आधी हाय कोर्टात नेतो आणि नंतर पार्टी देतो. अविचे अभिनंदन," असे त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

अश्नीरचे हे ट्वीट समोर आल्यानंतर लोकांनी कमेंट्स करत त्याच्या मुलावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘शार्क टँक इंडिया’मुळे अश्नीर ग्रोव्हर खूप लोकप्रिय झाला. तो त्याच्या रागीट स्वभावामुळे प्रसिद्ध होता. त्याच्या 'ये सब दोगलापण' या वन लाइनरवरुन खूप मीम्स बनवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...