आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे लोकप्रिय कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी उद्या म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान कियारामुळे शार्क टँक इंडिया या शोसाठी ओळखला जाणारा अश्नीर ग्रोव्हरचा संसार मोडणार होता. स्वतः अश्नीरने त्याच्या 'दोगलापन' या पुस्तकात कियारा अडवाणीचा उल्लेख केला आहे. कियारामुळे त्याचा घटस्फोट होणार होता, असा उल्लेख त्याने आपल्या या आत्मचरित्रात केला आहे.
अश्नीर ग्रोव्हरने त्याच्या 'दोगलपन' या आत्मचरित्रात सांगितले की, एकदा त्याच्या काही मित्रांत आणि त्याच्यात एका विषयावरुन संभाषण सुरु होते. यादरम्यान त्यांच्यातील एका मित्राच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्यांच्या या संभाषणात कियारा अडवाणीच्या स्थळाचा उल्लेख होता.
अश्नीरने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, 'मी माझ्या आईला गमतीने म्हटले की, जर माझे लग्न आताच्या काळात झाले असते, तर मलादेखील कियारा अडवाणीचे स्थळ सांगून आले असते.' पण दोघांचे हे बोलणे ऐकून अश्नीरची पत्नी माधुरी जैन यांना वाईट वाटले. यानंतर अश्नीर ग्रोव्हरसोबत त्याच्या पत्नीने बोलणे बंद केले होते. दरम्यान त्यांना एका कामाच्या निमित्ताने बाहेर जायचे होते. त्याचवेळी गाडीतून विमानतळापर्यंत जात असताना पत्नीने अश्नीरशी बराच वाद घातला.
अश्नीरने सांगितले की, माझी पत्नी मला म्हणाली, जेव्हा मी तुझ्याशी लग्न केले तेव्हा तुझ्याकडे काहीही नव्हते आणि आज तुला कियाराशी लग्न करायचे आहे. त्यावेळी आम्ही बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होतो आणि समोर बसलेली एक म्हातारी व्यक्ती आमचे भांडण पाहत होती. शेजारी बसलेल्या प्रवाशांसाठी ते मनोरंजनापेक्षा कमी नव्हते.
पिचर्स सीझन 2 मध्ये दिसला होता अश्नीर
अश्नीर ग्रोव्हर हा शार्क टँक इंडियाच्या सर्वात वादग्रस्त शार्क्सपैकी एक होता. शोमध्ये त्याच्या 'ये सब दोगलापन है' या वन लाइनरवर बरेच मीम्स बनवले गेले. त्याच नावाने त्याने त्याची बायोग्राफीही लाँच केली आहे. अलीकडेच तो पिचर्स सीझन 2 मध्ये देखील दिसला होता. या शोचा ट्रेलर शेअर करताना त्याने लिहिले होते, 'जब तक है ग्रोव्हर, इट्स नॉट ओवर!'
उद्या जैसलमेरमध्ये होणार आहे सिद्धार्थ-कियाराचे लग्न
कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी जैसलमेरचा सूर्यगड पॅलेस नववधूप्रमाणे नटवण्यात आला आहे. 7 फेब्रुवारीला दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा, करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि आकाश अंबानी रविवारी जैसलमेरला पोहोचले आहेत. मुकेश अंबानी यांची मुलगी आणि कियाराची बेस्ट फ्रेंड ईशा अंबानीही पती आनंद पिरामलसोबत जैसलमेरला पोहोचली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.