आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:'आश्रम 2' फेम अनुप्रिया गोयंका म्हणते - कुणावर श्रद्धा ठेवणे चांगले आहे पण अंधश्रद्धा ठेऊ नये

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझे कुटुंब एकाच बाबाला मानत होते, त्यांच्यावर खूपच श्रद्धा होती.

बॉबी देओल अभिनीत आणि प्रकाश झा दिग्दर्शित वेब सिरीज ‘आश्रम’चा दुसरा भाग रिलीज झाला आहे. पहिल्या भागात याची कथा जेथे संपली होती तेथूनच पुढची कथा दाखवण्यात आली आहे. सिरीजमध्ये एक फॉरेन्सिक डॉक्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाने आपले पात्र सिरीजची कथा, बाबा आणि पंडित यांच्याविषयी या मुलाखतीत चर्चा केली...

  • वेब सिरीज ‘आश्रम’मध्ये पात्रासाठी खास तयारी केली होती का ?

हो, मी याचा आधी अभ्यास केला. सोबतच काही व्हिडिओ आणि चित्रपट पाहिले. यात फॉरेन्सिक तज्ञ कशा प्रकारे काम करतात, त्यांचे काम काय असते, त्यांची बॉडी लँग्वेज कशी असते, या सर्व गोष्टी पाहिल्या आणि शिकल्या. त्यात काही व्हिडिओ खूपच भयंकर होते, ते पाहून भीती वाटत होती. मात्र मी फॉरेन्सिक डॉक्टरचे पात्र साकारत असल्यामुळे मला त्या गोष्टी पाहाव्या लागल्या आणि समजून घ्यावे लागले.

  • ‘आश्रम’ सिरीजची दुसरी कथा कशी आहे ? पुढे चालेल का ?

‘आश्रम’ सिरीज एक मधील माझे पात्र, नताशा, तिला एक सांगडा सापडतो, तो कुणाचा आहे, त्याच्यासोबत काही चुकीचे झाले आहे का? त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ती आपला जीव धोक्यात टाकते. आता सीझन 2मध्ये मी जे पात्र साकारत आहे, ते फार वेगळे आहे. तिला यात कळते की, ही कुणा एकाची समस्या नाही तर येथे खूप मोठी गडबड आहे. पहिल्या सीझनमध्ये बाबाला चांगले दाखवण्यात आले. त्यांच्यात माणूसकी दाखवण्यात आली. मात्र दुसऱ्या सीझनमध्ये बाबाचे खरे रूप दाखवण्यात आले आहे.

  • तू बाबांवर विश्वास ठेवतेस का ?

अनेक कुटुंबात लोक बाबांकडे जातात, त्यांना प्रत्येक गोष्ट विचारतात, त्यांच्या म्हणण्यानुसार चालतात. माझ्या कुटुंबातील लोकदेखील काही नवीन काम करायचे असेल किंवा सल्ला घ्यायचा असेल तर बाबांकडे जातात. त्यांच्याशी एकदा तरी बोलतात. त्यांचे ऐकतात आणि तसेच काम करतात. त्यांचे चांगले आणि वाईट दोन्ही रूप मी पाहिले आहे. कुणावर श्रद्धा ठेवणे चांगले आहे पण अंधश्रद्धा ठेऊ नये, मला ते योग्य वाटत नाही. तुम्हाला तुमच्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा. आपल्या मैत्रीवर, कुटुंबावर विश्वास ठेवायला हवा. मेहनत करायला हवी.

  • तुला कधी वाईट अनुभव आला का ?

माझे कुटुंब एकाच बाबाला मानत होते, त्यांच्यावर खूपच श्रद्धा होती. आमच्यासोबत कधीच काही चुकीचे झाले नाही मात्र त्यांच्याविषयी नेहमी चुकीच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या होत्या. काही दिवसांनंतर या सर्व गोष्टी समोर आल्या तेव्हा, माझी बहीण माझ्याकडे आली आणि मला समजून सांगितले. ती म्हणाली, आपण ज्या बाबाला मानतो, त्यांच्याविषयी काही चुकीच्या गोष्टी ऐकायला येत आहेत. तुला कधी काही गोष्टी चुकीच्या वाटल्या तर ते गुपचूप सहन करू नको, लपवू नको. स्वत:ला सुरक्षित ठेवणेच आपली पहिली जबाबदारी आहे. बहिणीने मला समजून सांगितले, तेव्हा खूप चांगले वाटले. कोणावरही डाेळे झाकून विश्वास करु नये.

बातम्या आणखी आहेत...