आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

  आठवणी:आशुतोष गोवारिकरांनी केले इरफान खानचे स्मरण, व्हिडिओ शेअर करुन सांगितले पहिल्यांदा कधी आणि कुठे पाहिले होते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरांनी इरफान खानला भारत एक खोज या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदा पाहिले होते.

चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर करुन दिवंगत अभिनेता इरफान खानसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी 'भारत एक खोज (डिस्कव्हरी ऑफ इंडिया)' या मालिकेच्या शूटिंग दरम्यान इरफानला पहिल्यांदा पाहिले आणि तेव्हापासून ते त्याच्या अभिनयाचे फॅन झाले होते.

त्यांनी शेअर केलेला व्हिडिओही या मालिकेचा आहे. व्हिडिओ शेअर करताना आशुतोष यांनी लिहिले की, 'अभिनेता म्हणून मी 1988 मध्ये श्याम बेनेगल बाबूंनी बनवलेल्या #डिस्कवरी ऑफ इंडियाचा भाग होता. एके दिवशी मी अकबर आणि त्याचा इतिहासकार बदामुनी यांच्यातील एक सीन पाहिला. तो सीन एका अज्ञात अभिनेत्याने अतिशय उत्कृष्टपणे. जेव्हा मी सहाय्यकाला विचारले तेव्हा मला कळले की त्याचे नाव # इरफान खान आहे. तेव्हापासून मी त्याचा चाहता आहे.

व्हिडिओ क्लिपमध्ये काय आहे?

गोवारिकर यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात अकबर आणि इस्लामच्या अनेक मौलवी यांच्यात मुताह (तात्पुरता विवाह) याबाबत वादविवाद सुरू आहेत. दरम्यान, अकबर आपला इतिहासकार बदायुनी (इरफान) यांना विचारतो की, इस्लाम मुताहची परवानगी देतो का? त्यावर तो  म्हणतो की, 'हुजूर ये काझी साहेबांवर अवलंबून आहे, जर काझी साहेब त्या धर्मशास्त्राशी संबंधित असतील जेथे मुताहला परवानगी आहे, तर ते कायदेशीर म्हणून मान्य केले जातील, अन्यथा मुताह शरीयतच्या नियमांच्या विरोधात आहे.'

गेल्या महिन्यात इरफान यांचे निधन झाले

आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी, 29 एप्रिल रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. कोलोनच्या संसर्गामुळे त्याला आठवडाभरापूर्वी तेथे दाखल करण्यात आले होते आणि आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.  

बातम्या आणखी आहेत...