आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

53 वर्षांचे झाले आशुतोष राणा:अशी झाली होती आशुतोष आणि रेणुका यांची पहिली भेट,  गुरुजींनी सांगितले होते - 'हीच योग्य मुलगी'

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशुतोष यांच्या फोटोचा कोलाज शेअर करुन रेणुका यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेते आशुतोष राणा 10 नोव्हेंबरला आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विटरवर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आशुतोष यांच्या फोटोचा कोलाज शेअर करताना रेणुका यांनी लिहिले की, ''मी तुमच्यावर कायम आणि त्यापलीकडे कायम प्रेम करत राहील. वाढदिवसाच्या शुभेच्छा राणाजी.''

फिल्मी आहे दोघांची लव्ह स्टोरी

राजेश्वरी सचदेवनी करुन दिली होती ओळख
हंसल मेहता यांच्या एका सिनेमाच्या 'ट्रायल'वेळी आशुतोष राणा राजेश्‍वरी सचदेवसोबत आले होते. राजेश्वरी आणि रेणुका शहाणे या जुन्या मैत्रिणी आहेत. येथे ब-याच दिवसांनी राजेश्वरीशी भेट झाल्याने आशुतोष यांच्याकडे रेणुका यांचे लक्षच गेले नव्हते. त्यावेळी राजेश्‍वरीनेच या दोघांची ओळख करुन दिली होती. त्यावेळी रेणुका यांनी आशुतोष यांचा 'दुश्‍मन' सिनेमा पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांना ती ओळखू शकली नाही. मात्र आशुतोष यांनी हम आपके है कौन या चित्रपटातील रेणुका यांचे काम पाहिले होते आणि ते त्यांच्या कामाने प्रभावित होते. यावेळी जवळजवळ अर्धा तास दोघांत बोलणे झाले होते. त्या भेटीनंतर मात्र दोघे संपर्कात नव्हते.

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आशुतोष यांनी केला होता फोन

17 ऑक्टोबर 1998 रोजी आशुतोष यांनी रेणुका यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर त्यांचे वरचेवर फोन सुरू झाले. एरवी इतरांशी फारशा गप्पा न मारणा-या रेणुका यांची आशुतोष यांच्याशी वेव्ह लेंथ जुळू लागली. ओळख झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे 31 डिसेंबर 1998 रोजी या दोघांची भेट झाली होती.

आशुतोष यांना त्यांच्या गुरुजींनी सांगितले, 'हीच योग्य मुलगी'
आशुतोष राणा यांच्या त्यांच्या गुरुंवर खूप विश्वास आहे. त्यांना ते दादाजी म्हणतात. त्यांच्या म्हणण्यावरुनच आशुतोष यांनी अभिनयात करिअरचा विचार केला. याच दादाजींनी "ही मुलगी तुला तुझ्यासाठी योग्य आहे'', असे सांगितले होते. एक दिवस आशुतोष यांनी रेणुकाला लग्नाची मागणी घातली. खूप विचार करून रेणुका यांनी आशुतोष यांना होकार दिला.

दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2001 मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 25 मे 2001 रोजी आशुतोष यांच्या मुळगावी झाले होते. आशुतोष आणि रेणुका यांच्या लग्नाला आता 19 वर्षे झाली आहेत. ते दोन मुलांचे आईवडील आहेत. शौर्यमन आणि सत्येंद्र ही त्यांच्या दोन्ही मुलांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...