आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रेक पॉइंट':महेश भूपति आणि लिएंडर पेस या जोडगोळीवर आधारित वेब सीरिज 'ब्रेक पॉइंट'चे चित्रीकरण पूर्ण, दिग्दर्शिका म्हणाली - ‘दोन चॅम्पियन्ससोबत झाली आयुष्यभरासाठी मैत्री’

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सीरिजचे लेखन-दिग्दर्शन स्वत: अश्विनी अय्यर तिवारीने केले आहे.

बहुआयामी लेखक-चित्रपट निर्माता अश्विनी अय्यर तिवारीने भारतीय टेनिस स्टार महेश भूपति आणि लिएंडर पेस यांच्यावर आधारित वेब सीरिज ब्रेक पॉइंटचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण केले आहे. या सीरिजचे लेखन-दिग्दर्शन स्वत: अश्विनीने केले आहे.

महेश भूपति-लिएंडर पेस या जोडगोळीवर आधारित वेब सीरिजवर काम करताना अश्विनी अय्यर तिवारीची या दोन चॅम्पियन्ससोबत आयुष्यभारासाठी मैत्री झाली असून हे आमच्यातील सुंदर सहयोगाचे प्रतीक असल्याचे अश्विनीने म्हटले आहे.

या सीरिजवर जवळपास दीड वर्ष सुरु असलेले काम पूर्ण झाल्याचे जाहीर करताना तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर लिहिले,"महेश भूपति आणि लिएंटर पेस यांच्या सोबतचा दीड वर्षांचा प्रवास पूर्ण झाला असून इथून पुढे आयुष्यभराच्या मैत्रीची नवी यात्रा सुरु झाली आहे. नितेश तिवारी आणि मी पहिल्यांदा सह-दिग्दर्शन करत आहोत. माहितीपटासाठी दोन अतिशय प्रतिभावान चॅम्पियन्सची माहिती संकलित करणे आणि लिहिणे हे देखील नितेश, पीयूष आणि माझ्यासाठी पहिल्याच अनुभव होता. आम्ही खूप आभारी आहोत आमचे स्टूडियो पार्टनर्स zee5, ज्यांच्यासोबत या महामारीच्या कठिण काळात देखील जगभर मोठ्या प्रमाणात याची निर्मित करण्यात आम्ही यशस्वी झालो. या वेब सीरिजच्या पॅकेजिंगसाठी कलेक्टिव आर्टिस्ट नेटवर्क आणि प्रत्येक स्पोर्ट्स पार्टनर, स्पोर्ट्स पर्सन, लाइन प्रोड्यूसर यांना धन्यवाद! ज्यांच्यामुळे #Breakpoint ला आकार मिळाला.'

अश्विनीने या आधी 'नील बट्टे सन्नाटा' आणि 'बरेली की बर्फी' सारख्या प्रोजेक्टसोबत चित्रपट निर्माता म्हणून केलेल्या कार्याला समीक्षकांनी गौरवलेले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तिच्या 'मॅपिंग लव्ह' या पुस्तकाला देखील वाचक आणि बॉलिवूडमधील तारे-तारकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

तसेच, सोनी लिववरील 'फाडू' या वेब सीरिजद्वारे निर्माती ओटीटीच्या जगात पदार्पण करण्यास सज्ज आहे. तसेच, सध्या ती नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या जीवनचरित्रावर काम करत असून हा तिच्या आवडत्या प्रोजेक्टपैकी एक आहे.

बातम्या आणखी आहेत...