आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Breaking News Update | Today Latest Trending Entertainment Celebrity News, Assam CM Himanta Biswa Sarma Announces, Employees Will Get Half Day To Watch The Kashmir File

बॉलिवूड LIVE अपडेट्स:संजय दत्त स्टारर 'घुडचडी'चे पहिले शेड्यूल पूर्ण, 'गॉडफादर' मध्ये चिरंजीवीसोबत दिसणार सलमान खान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

संजय दत्त स्टारर 'घुडचडी' या चित्रपटाचे पहिले शेड्युल पूर्ण झाले आहे. दिल्ली आणि जयपूरमध्ये याचे शूटिंग झाले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर ही माहिती दिली आहे. 'घुडचडी'मध्ये संजय दत्तशिवाय रवीना टंडन, खुशाली कमार आणि पार्थ दिसणार आहेत.

  • चिरंजीवीसोबत 'गॉडफादर'मध्ये दिसणार आहे सलमान खान

बॉलिवूड अभिनेता सलमान खान साऊथचे सुपरस्टार चिरंजीवींच्या 'गॉडफादर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तो तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अलीकडेच चिरंजीवी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानसोबतचा एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आणि लिहिले, "गॉडफादर तुझे स्वागत आहे भावा. तुझ्या एंट्रीने सर्वांमध्ये ऊर्जा भरली आहे आणि उत्साहाची पातळी आणखी उंचावली आहे. तुझ्यासोबत स्क्रीन शेअर करणे ही आनंदाची गोष्ट आहे." या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत. हा मल्याळम सुपरहिट चित्रपट 'लुसिफर'चा रिमेक असेल.

  • करीना कपूरने अनटाइटल्ड प्रोजेक्टचे सुरु केले शूटिंग

करीना कपूरने आपल्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगची घोषणा करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, '...आणि सुरुवात झाली.' या अद्याप शीर्षक न ठरलेल्या प्रोजेक्टचे दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहेत. यात करीनाशिवाय विजय वर्मा आणि जयदीप अहलावत देखील दिसणार आहेत.

  • आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची घोषणा, 'द काश्मीर फाइल्स' पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना मिळेल अर्ध्या दिवसाची रजा

'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट 11 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्तही केला आहे. आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ही माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, "आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना 'द काश्मीर फाइल्स' पाहण्यासाठी अर्ध्या दिवसाची विशेष सुट्टी दिली जाईल, हे जाहीर करताना आनंद होत आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे तिकीट जमा करावे लागेल.'

बातम्या आणखी आहेत...