आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेवटचे गाणे:नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी वयाच्या 71 व्या वर्षी 'टायगर ऑफ राजस्थान'साठी केली होती कोरिओग्राफी, फेब्रुवारीत शूट झाले होते घुमर साँग

किरण जैन, मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरोज खान जवळजवळ चार दशकं फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत होत्या.

बॉलिवूडची लाडकी नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे 3 जुलै रोजी वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी नृत्यदिग्दर्शनाला सुरुवात केली होती, त्यांचे हे काम   निधनाच्या पाच महिन्यांपूर्वीपर्यंत सुरु होते. याचवर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी 'टायगर ऑफ राजस्थान' या प्रादेशिक चित्रपटासाठी एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक अरविंद कुमार यांनी दैनिक भास्करला त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.

  • 'त्यांना घुमर गाण्याबद्दल सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार दिला'

अरविंद म्हणाले, "आम्ही त्यांच्या बरोबर 22 ते 24 फेब्रुवारी 2020 च्या दरम्यान एक गाणे शूट केले होते, जे घुमरवर आधारित होते. सरोज खान  जवळ जवळ वर्षभरापूर्वी आमच्या घराच्या मागे राहायला आल्या होत्या. त्या तिथे आपल्या भावासोबत राहात होत्या. त्यांची प्रकृती बर्‍याच दिवसांपासून नाजूक होती, परंतु त्यांनी कधीच काम करणे थांबवले नाही. जेव्हा या चित्रपटाचा विषय निघाला तेव्हा मी सरोज खान यांना या प्रोजेक्टशी जोडण्याविषयी बोललो होतो. अर्थात वयाच्या या टप्प्यावर काम करणे थोडे अवघड होते. त्यामुळे त्या हो म्हणतील   याविषयी आम्ही थोडे संभ्रमात होतो, पण त्यांनी या गाण्यासाठी लगेच होकार दिला."

'टायगर ऑफ राजस्थान' या चित्रपटाच्या सेटवर सरोज खान
'टायगर ऑफ राजस्थान' या चित्रपटाच्या सेटवर सरोज खान
  • 'त्या फक्त आपल्या एक्सप्रेशन्सने काम करायच्या'

अरविंद  पुढे म्हणाले, "सरोज खान यांची एक  संपूर्ण टीम होती, जी नेहमीच त्यांच्याबरोबर असायची. आम्ही हे गाणे 3 दिवस शूट केले आणि सरोजजी दररोज सेटवर हजर असायच्या. त्या जास्त काळ उभ्या राहू शकत नव्हत्या. परंतु आपल्या असिस्टंटला सांगून कलाकाराकडून स्टेप्स करुन घेत होत्या. सेटवरील भेटी, रिहर्सलपासून ते गाण्याचे शूटिंग होईपर्यंत, प्रत्येकवेळी त्या हजर होत्या. त्या केवळ आपल्या एक्सप्रेशन्सने काम करायच्या.

अभिनेता, दिग्दर्शक अरविंद कुमार आणि त्यांच्या पत्नी नीलू वाघेला यांच्यासोबत सरोज खान.
अभिनेता, दिग्दर्शक अरविंद कुमार आणि त्यांच्या पत्नी नीलू वाघेला यांच्यासोबत सरोज खान.
  • सेटवर त्या म्हणायच्या - मला या गाण्यात जीव ओतायचा आहे 

अरविंद म्हणाले, "2012 मध्ये मी आणि माझी पत्नी नीलू वाघेला 'नच बलिये'मध्ये सगभागी झालो होतो. सरोजजी त्या कार्यक्रमात पाहुण्या म्हणून आल्या होत्या. मला तेव्हापासूनच त्यांच्याबरोबर काम करायचे होते. त्या आज निघून गेल्यानंतर त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा तर पूर्ण झाली पण तरीदेखील काही तरी अधुरे वाटत आहे. काही तरी हातून निसटले आहे, असे वाटत आहे. सेटवर त्या म्हणायच्या कीस मला या गाण्यात जीव ओतायचा आहे. त्यांचे हे शब्द कायम माझ्या लक्षात राहतील. घुमर हे गाणे अभिनेत्री दीपशिखा नागपालवर चित्रीत झाले होते.'

बातम्या आणखी आहेत...