आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिकेटर केएल राहुलने अलीकडेच सोशल मीडियावर एक लाइव्ह सेशन केले होते. त्यात त्याने त्याच्या फॉलोअर्सना आजचा दिवस कसा घालवायचा याबाबत सल्ला मागितला होता. यावर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी हिने देखील त्याला एक सुंदर सल्ला दिला. मात्र त्यावर राहुलने खूपच मजेशीर उत्तर दिले.
राहुलने पोस्टमध्ये शेअर केला मजेशीर फोटो
केएल राहुलच्या या लाइव्ह सेशनमध्ये अथिया म्हणाली, 'तू मला फेसटाइम (व्हि़डिओ कॉल) करायला हवा.' यावर राहूलने एक खास फोटो शेअर करत उत्तर दिले आहे. राहुलने एका मांजरीच्या कॉश्च्युममधील व्यक्तीसोबत फोटो शेअर केलाय. 'जेव्हा तू व्हिडिओ कॉल उचलत नाहीस तेव्हा माझा चेहरा असा असतो,' असे म्हणत राहुलने या फोटोमध्ये अथियाला टॅग केले आहे.
अशी सुरु झाली राहुल आणि अथियाच्या अफेअरची चर्चा
मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, एका ब्रॅण्डच्या जाहिरातीदरम्यान अथिया आणि राहुलची मैत्री झाली. भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर असताना राहुल आणि अथियाच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या टूरवर खेळाडूंना त्यांच्या सोबत जाण्यासाठी त्यांच्या पत्नी किंवा पार्टनरची नावे द्यायची होती. त्यावेळी राहुलने अथिया शेट्टीचे नाव पार्टनर म्हणून दिले होते. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप दोघांनी त्याच्या रिलेशनशिपबद्दर जाहीरपणे कबुली दिलेली नाही.
अथियाचे करिअर
अथिया ही बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. तिने 2015 मध्ये सूरज पंचोलीसह हीरो चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती अखेरची मोतीचूर चकनाचूर या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकली होती. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अद्याप तिच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा झालेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.