आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल त्यांच्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत असतात. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच दोघांच्या लग्नाच्या तारखाही समोर आल्या आहेत.
पुढच्या वर्षी होणार आहे लग्न
केएल राहुलच्या जवळच्या मित्राने पिंकविलाला दिलेल्या माहितीनुसार, अथिया आणि केएल राहुल जानेवारी 2023 मध्ये लग्न करणार आहेत. 21 ते 23 जानेवारी दरम्यान दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम होणार आहेत. लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत, त्यामुळे दोन्ही कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
दोघांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे
दोघांचे लग्न दाक्षिणात्य रितीरिवाजांनुसार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हळद, मेंदी, संगीत यासह इतर अनेक विधी होतील. या सोहळ्याला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी होतील. या जोडप्याच्या लग्नाचे आमंत्रण डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांत दिले जाणार आहे. आता ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर या कपलचे चाहते आनंदी असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करत आहेत.
लग्न लवकरच होणार - सुनील
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांना केएल राहुल आणि अथियाचे लग्न कधी होणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी लग्न लवकरच होईल असे सांगितले होते.
दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत
राहुल आणि अथिया जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत सुटीवर जात असतात. बरेच दिवस दोघांनीही आपले नाते गुपित ठेवले होते. अथियाने अनेकदा केएल राहुलसोबत त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना हजेरी लावली.
अथियाने 2015 मध्ये केली होती करिअरची सुरुवात
अथियाने 2015 मध्ये सूरज पांचोलीसोबत 'हीरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यासोबतच तिने आणखी दोन चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'मुबारकां' आणि 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटांमध्ये ती झळकली. 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटात तिच्यासह नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.