आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल सोमवारी विवाहबंधनात अडकले. मात्र, आतापर्यंत दोघांचे कोणतेही फोटो समोर आलेले नाहीत. लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसह केवळ 100 लोक उपस्थित होते. सायंकाळी साडेसहा वाजता राहुल आणि अथिया मीडियाला भेटणार असल्याचे बोलले जात आहे.
अथियाचे खास मित्र कृष्णा श्रॉफ, अंशुला कपूर, डायना, क्रिकेटर इशांत शर्मा, वरुण आरोन यांनी हजेरी लावली. येथे सर्व पाहुण्यांच्या हातात लाल पट्टी बांधली होती. जेणेकरून ते आमंत्रित आहेत हे कळेल. या बँडशिवाय आत कोणीही प्रवेश दिला नाही. लग्नस्थळाबाहेरही कडक सुरक्षा तपासणी करण्यात आली.
आयपीएल संपल्यानंतर रिसेप्शन
भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका सुरु असल्याने अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाला सर्व क्रिकेटपटू उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) संपल्यानंतर मे महिन्यांत सर्व क्रिकेटपटूंसाठी भव्य रिसेप्शन देण्यात येणार आहे.
विराटची हजेरी नाही
केएल राहुलचा खास मित्र विराट कोहली या लग्नाला उपस्थित राहणार नाही. कारण, विराट-कोहली भारत-न्यूझीलंड सामन्यात व्यस्त आहे. या लग्नातील विशेष बाब म्हणजे दक्षिण भारतीय पद्धतीने पाहुण्यांना केळीच्या पानांवर जेवण दिल्याची माहिती आहे. जेवणात दक्षिण भारतीय पदार्थ ठेवण्यात आले होते.
सब्यसाचीने डिझाइन केले लग्नाचे कपडे
अथिया आणि केएल राहुल यांचे लग्न खूप खास होता. कारण, त्यांच्या लग्नाचे कपडे सब्यसाचीने डिझाइन केले होते. या खास प्रसंगी अथिया लाल रंगात नाही. तर पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली.
अजय देवगणची खास पोस्ट
अथिया आणि केएल राहुलच्या लग्नापूर्वी अजय देवगणने सुनील शेट्टीसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच आथिया आणि राहुलला आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
प्री-वेडिंग फंक्शन्स 21 जानेवारीपासून सुरू
21 जानेवारीपासून अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले होते. 22 जानेवारीला हळदीचा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे काही फुटेजही समोर आले होते. ज्यामध्ये पाहुणे बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकताना दिसत होते. या सोहळ्यात फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ, क्रिकेटपटू वरुण आरोन, हृतिक भसीन, पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवाल तसेच अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला उपस्थित होते.
4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये
राहुल आणि अथिया जवळपास 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. राहुल हा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे. तर अथिया ही अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. दोघांचे कुटुंब कर्नाटकचे आहे. अथियाने तिच्या करिअरमध्ये 4 चित्रपट केले आहेत. तर सलमान खानच्या प्रोडक्शन अंतर्गत बनलेल्या हिरो या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. दोघांच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर अथियाची एकूण संपत्ती 29 कोटी आहे. त्याचवेळी केएल राहुल वार्षिक 30 कोटी कमावतो.
कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून पहिली भेट
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर संवाद सुरू झाला आणि दोघांची मैत्री झाली. एकत्र वेळ घालवताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सिक्रेट रिलेशिनशिपमध्ये प्रवेश केला. दोघेही नेहमीच चर्चेत राहिले, पण असे असतानाही दोघांनीही आपले नाते गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रिलेशनशिपमध्ये असूनही, दोघेही जवळपास दीड वर्ष एकमेकांसोबत कधीही दिसले नाहीत, दोघांनी कधीही एकत्र फोटो पोस्ट केले नाहीत. येथे वाचा संपुर्ण बातमी.
अथिया-राहुलच्या लग्नाआधी आली सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी 23 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. 21 जानेवारीपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून हळदीचा कार्यक्रम सुरू होईल. याआधी 21 जानेवारीला हळद लावण्याचे वृत्त आले होते, पण आता बातम्या येत आहेत, त्यानुसार आज हळदीचा विधी पूर्ण होणार आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.