आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या आठवड्याभरानंतर कामावर परतली अथिया शेट्टी:ब्रँड शूटसाठी सेटवर झाली स्पॉट, कॅज्युअल लूकमध्ये दिसली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अथिया शेट्टी आणि केएल राहुल 23 जानेवारी रोजी खंडाळ्यात विवाहबद्ध झाले. दोघांचे लग्न होऊन फक्त एक आठवडा झाला आहे. लग्नाच्या आठवड्याभरानंतरच अथिया कामावर परतली आहे. नुकतीच ती मुंबईत स्पॉट झाली. समोर आलेल्या फोटोंमध्ये अथिया कॅज्युअल लूकमध्ये दिसली.

कमर्शियल ब्रँडच्या शूटिंगसाठी पोहोचली होती अथिया
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया एका कमर्शियल ब्रँडच्या शूटिंगसाठी आली होती. यादरम्यान, तिने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम पँट घातला होता. अथियाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

कॅज्युअल लूकमुळे ट्रोल झाली अथिया
याआधी अथिया आणि केएल राहुल सोमवारी एका रेस्तराँबाहेर स्पॉट झाले होते. लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच डिनर डेटला बाहेर गेले होते. यादरम्यान अथियाने पारंपारिक कपडे नव्हे तर कॅज्युअल आउटफिट परिधान केला होता. यावेळी तिने मंगळसूत्रही घातले नव्हते.

असे दिसते की तिचे लग्न झालेच नाही - ट्रोलर्स
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अथियाला तिच्या आउटफिटमुळे खूप ट्रोल करण्यात आले. तिने लग्नानंतर पारंपारिक कपडे घालायला हवे होते, असे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले- 'ती नवविवाहितेप्रमाणे कपडे घालून आली असती तर बरे झाले असते.' आणखी एका युजरने लिहिले - 'तिचे नुकतेच लग्न झाले आहे, असे वाटत नाही.'

अथियाने 2015 मध्ये केली करिअरला सुरुवात
अथियाने 2015 मध्ये सूरज पांचोलीसोबत 'हिरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यासोबतच 'मुबारका' आणि 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटांमध्ये ती झळकली होती. मोतीचूर चकनाचूर या चित्रपटात अथिया नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकली होती.

बातम्या आणखी आहेत...