आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Atrangi Re Film Will Be Released On OTT Platform Not In Cinemas, The Makers Introduced The Characters Of Sara Ali Khan, Akshay Kumar And Dhanush

अतरंगी रे:थिएटर नव्हे OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार चित्रपट, ट्रेलर रिलीजच्या एक दिवस आधी सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष यांचा फर्स्ट लूक रिव्हील

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'अतरंगी रे'चा ट्रेलर 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटातील मुख्य भूमिकेतील अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा लूकही रिलीज केला आहे. विशेष म्हणजे चित्रपटगृहांऐवजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल, असेही सांगण्यात आले आहे.

'अतरंगी रे'ची मुख्य अभिनेत्री सारा अली खानने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया पेजवरून सर्व मुख्य पात्रांची ओळख करून दिली आहे. सर्वप्रथम, धनुषचा लूक शेअर करताना तिने लिहिले, विष्णूला भेटा, आमचे पहिले पात्र. पोस्टरमध्ये धनुष एका सामान्य तरुण मुलासारखा दिसत आहे.

दुसरी ओळख साराने अक्षय कुमारच्या व्यक्तिरेखेची करुन दिली आहे. यासह, सारा लिहिते, प्रत्येक वेळी हे अतरंगी स्टाइलमध्ये एंट्री घेतात. नेक्स्ट लेव्हल एनर्जी, अद्भुत प्रेम. तर अक्षय कुमारला भेटायला तयार व्हा.

शेवटी साराने तिची व्यक्तिरेखा रिंकूची ओळख करून दिली आहे. यासह तिने लिहिले आणि शेवटी रिंकूला भेटण्याची वेळ आली आहे. तिला तुमचे भरपूर प्रेम द्या आणि ती तुमचे आभार मानेल. बिहारमधून ही मुलगी आली आहे, असे साराने म्हटले आहे.

आनंद एल राय यांच्या अतरंगी रे या चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे. हिमांशू शर्मा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांची टी-सीरीज, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे. या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...