आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTT चा खिलाडीसुद्धा अक्षय कुमारच:120 कोटींच्या निर्मिती खर्चात बनलेल्या 'अतरंगी रे'ला डिस्ने + हॉटस्टारने तब्बल 200 कोटींना विकत घेतले, रिलीजपूर्वीच सुपरहिट फिल्मसारखी केली कमाई

हिरेन अंतानी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थिएटर कमाईच्या तुलनेत OTT वर अधिक मोठी ऑफर मिळाली.
  • थिएटर उघडल्यानंतर OTT प्लॅटफॉर्म अधिक आक्रमक व्यवसाय करतील.

थिएटरमध्ये 'सूर्यवंशी'च्या शानदार कमाईनंतर अक्षय कुमारने ओटीटीवरही तोच खिलाडी असल्याचे सिद्ध केले आहे. 24 डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या अतरंगी रे या त्याच्या नवीन चित्रपटाला आतापर्यंतची सर्वात मोठी डील मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटस्टारने अतरंगी रे हा चित्रपट तब्बल 200 कोटी रुपयांना विकत घेतला आहे, जी डायरेक्ट OTT रिलीजसाठी आतापर्यंतची बॉलिवूडची सर्वात मोठी डील आहे.

अतरंगी रेला मिळालेल्या डीलवरून हे स्पष्ट झाले आहे की, थिएटर उघडल्यानंतर OTT प्लॅटफॉर्म यूजर्सना आकर्षित करण्यासाठी बड्या स्टार्सचे चित्रपट डायरेक्ट OTT रिलीजसाठी मोठ्या किंमतीत खरेदी करण्यास तयार आहेत. अशा प्रकारे, कलेक्शनच्या बाबतीत, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच 200 कोटींच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन क्लबमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाचा निर्मिती खर्च जवळपास 120 कोटी रुपये आहे, 200 कोटींच्या ओटीटी डीलमुळे हा चित्रपट रिलीज न होताच सुपरहिट ठरला आहे.

सलमानने आपला निर्णय बदलला, अक्षयने नाही
सलमान खानचा 'अंतिम' हा चित्रपट डायरेक्ट ओटीटी रिलीज होणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते, पण थिएटर सुरू झाल्यानंतर सलमान खानने निर्णय बदलला आणि तो आधी थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 'अतरंगी रे' या चित्रपटाचेदेखील ओटीटी रिलीज आधीच ठरवले असले तरी तो निर्णय बदलणे अशक्य नव्हते.

'सूर्यवंशी'ने अक्षय कुमारला बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा एक प्रसिद्ध आणि विश्वासार्ह स्टार म्हणून स्थापित केले आहे. तरीही 'अतरंगी रे'चे निर्माते थिएटरकडे वळले नाहीत. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतरही चित्रपट व्यवसायात ओटीटीची स्थिती कायम असल्याचे यावरून दिसून येते.

थिएटर रिलीजसाठी चांगली तारीख मिळू शकली असती
चित्रपट निर्माते आणि व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी सांगितले की, 'अतरंगी रे' कोणत्याही तारखेला आला असता तरी छोट्या मोठ्या चित्रपटांनी त्याला जागा मिळवून दिली असती. पण OTT वर चित्रपट थेट प्रदर्शित करणे म्हणजे निर्मात्यांना OTT करारामध्ये थिएटरमधून मिळणाऱ्या अंदाजे कमाईपेक्षा अधिक नफा मिळत आहे.

ओटीटीकडून चांगल्या टायटल्सची खरेदी अधिक आक्रमक होईल, असे जोहर यांचे म्हणणे आहे. आता ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपटांच्या निवडीत अधिक सावध झाले आहेत. नवीन प्रेक्षक जोडता यावेत, सध्याच्या प्रेक्षकांना जोडून ठेवता यावे, यासाठी असे मोठे चित्रपट खरेदी होत राहतील.

निर्मात्यांची चांदी

फिल्म डिस्ट्रिब्युशन आणि मार्केटिंग कंपनी परसेप्ट पिक्चर्सचे बिझनेस हेड युसूफ शेख म्हणाले की, 'अतरंगी रे' हा हॉटस्टारसाठी ख्रिसमसच्या सुट्टीत प्रेक्षकांना एंगेज ठेवण्यासाठी एक प्राइज कॅच आहे.

युसूफ स्पष्ट करतात की, मोठ्या स्टार्सचे नवीन चित्रपट हे OTT प्लॅटफॉर्मसाठी त्यांचे सब्सक्राइबर्स टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन सब्सक्राइबर्स जोडण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे, OTT कडून अशा एग्रेसिव्ह डील्स आगामी काळातही होत राहतील. निर्माते देखील नफ्याच्या आधारावर थिएटर किंवा ओटीटी यापैकी एकाची निवड करणे सुरू ठेवतील.

तो निर्मात्यांचा निर्णय आहे
एक अग्रगण्य वितरक अक्षय राठी म्हणाले की, थिएटर संचालक म्हणून मला वाटते की अक्षय कुमारसारखा स्टार आणि आनंद रायसारखा निर्माता चित्रपटगृहात आला असता तर चांगले झाले असते, परंतु प्रत्येक चित्रपट निर्मात्यची स्वतःचा एक बिझनेस निर्णय असतो. ज्याचा आम्ही आदर करतो. येत्या वर्षभरात अनेक चित्रपटांची रांग लागली आहे, त्यामुळे चित्रपटगृहांना चित्रपट मिळत राहतील.
असेही होऊ शकते की चित्रपट बनल्यानंतर हा चित्रपट थिएटर स्केलचा नसून स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी अधिक चांगला आहे असे निर्मात्यांना वाटू शकते. अशा परिस्थितीत निर्मातेओटीटीकडे वळू शकतात.

अ‍ॅक्शन चित्रपट सुरक्षित असतात, इतर जॉनरसाठी कठीण
उत्तर भारताचे फिल्म डिस्ट्रिब्यूटर आणि एक्झिबिटर संजय घई म्हणाले की, या क्षणी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चांगली तारीख शोधण्यासाठी काही महिने लागू शकतात. त्याऐवजी, जर OTT कडून चांगली डील मिळाली असेल, तर निर्मात्यांनी नफा घेऊन चित्रपट सोडणे चांगले मानले असावे.

तसेही आशयानुसार अ‍ॅक्शन चित्रपट थिएटर व्यवसायात नेहमीच सुरक्षित असतात. 'सूर्यवंशी'ने चांगली कामगिरी केली, 'सत्यमेव जयते 2'नेही चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे, कारण त्यात अ‍ॅक्शन आहे. 'बंटी और बबली 2' चालला नाही कारण त्यात अ‍ॅक्शन नव्हती. कदाचित हीच गोष्ट 'अतरंगी रे'वरही लागू होऊ शकते. उत्तर भारतात अक्षयचे खूप चाहते आहेत, पण त्याला अॅक्शन हिरो म्हणून अधिक पसंत केले जाते.

अक्षयसोबत मोठा योगायोग

योगायोगाची बाब म्हणजे, गेल्या दोन वर्षांत अक्षय कुमार ओटीटी आणि थिएटर रिलीजच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणाशी जोडला गेला आहे. 2020 मध्ये OTT वर येणारा त्याचा स्वतःचा 'लक्ष्मी' हा सर्वात मोठा पहिला चित्रपट होता. चित्रपटगृहे बंद असल्याने दुसरा पर्याय नव्हता.

या वर्षी जेव्हा थिएटर्स सुरू झाले, तेव्हा त्याचा 'बेलबॉटम' हाच पहिला चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आणि थिएटर व्यवसायाला पुनरुज्जीवित करणारा चित्रपटही 'सूर्यवंशी' ठरला. आता थिएटर्स सुरू झाल्यानंतरही 'अतरंगी रे' हा OTT वर प्रदर्शित होणारा पहिला मोठा चित्रपट ठरणार आहे.

अक्षय सुपरहिट, आनंद राय यांन प्रतिक्षा
अक्षयचा 'सूर्यवंशी' सुपरहिट झाला आहे. दुसरीकडे आनंद एल. राय अनेक वर्षांपासून मोठ्या व्यावसायिक यशाची वाट पाहत आहेत. शाहरुखसारखा मोठा स्टार असूनही त्यांचा 'झिरो' चित्रपट चांगला व्यवसाय करू शकला नाही. त्यामुळे आता 'अतरंगी रे'कडूनच त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

बातम्या आणखी आहेत...