आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता जॉन अब्राहमचा अॅक्शन चित्रपट 'अटॅक' 1 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फिटनेस फ्रिक जॉनने एक मोठा खुलासा केला आहे. अॅक्शन स्टार जॉनने खुलासा केला की, काही वर्षांपूर्वी 'फोर्स 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे डॉक्टर त्याचा उजवा पाय कापणार होते.
या कारणामुळे डॉक्टरांना जॉनचा पाय कापायचा होता जॉन अब्राहम म्हणाला, "माझ्या उजव्या पायात गॅंग्रीन झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी मला अॅक्शन सीन करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. काही स्टंट खूप प्राणघातक असतात. मला आठवते की 'फोर्स 2' दरम्यान माझा गुडघा मोडला होता आणि तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. माझ्या उजव्या पायात गँगरीन झाला होता आणि डॉक्टरांना माझा पाय कापायचा होता. मी म्हणालो, 'नाही, तुम्ही ते करू शकत नाही.' पण, माझे मुंबईतील सर्जन डॉ. राजेश मणियार यांचे आभार, त्यांनी माझा गुडघा वाचवला."
अॅक्शन सीन्सवेळी काळजी घ्यायला हवी
जॉन अब्राहम म्हणाला, "हे जवळपास 7 वर्षांपूर्वी घडले होते आणि आता तो काळ निघून गेला आहे. मी आज स्वतःच्या पायावर चालतोय आणि पूर्वीपेक्षा आता अधिक लवचिक आणि वेगवान आहे. मला अॅक्शन करायला आवडतं. अर्थातच, मी एक ब्रेक घेतो आणि काहीतरी वेगळे करतो. पण, मला अॅक्शनमध्ये परत यायला आवडते. अॅक्शन करताना सावधगिरी बाळगणे नक्कीच आवश्यक आहे. कधी कधी तुम्हाला दुखापत होते आणि मग तुम्ही थोडे अधिक जागरूक होतात."
जॉनचा 'फोर्स 2' 2016 मध्ये रिलीज झाला होता
2016 मध्ये अभिनय देव दिग्दर्शित 'फोर्स-2' हा एक अॅक्शन स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात जॉनशिवाय सोनाक्षी सिन्हा आणि ताहिर राज भसीन हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'फोर्स'चा सिक्वेल होता. या चित्रपटाचे लेखन परवेझ शेख आणि जसमीत के रीन यांनी केले. 'फोर्स 2' ची निर्मिती जॉन, विपुल अमृतलाल शाह आणि वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स यांनी केली होती.
शाहरुखच्या 'पठाण'मध्ये दिसणार आहे जॉन
वर्क फ्रंटवर, जॉन अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अटॅकमध्ये झळकला आहे. या अॅक्शन ड्रामा चित्रपटात जॉन हा सुपर सोल्जरच्या भूमिकेत आहे. जॉनशिवाय या चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
जॉनकडे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा 'पठाण' देखील आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. जॉनचे 'धूम', 'दोस्ताना', 'काबुल एक्स्प्रेस', 'न्यूयॉर्क', 'वॉटर', 'नो स्मोकिंग', 'टॅक्सी नंबर 9211', 'मद्रास कॅफे', 'बाटला हाउस', 'सत्यमेव जयते', 'रोमियो अकबर वॉल्टर' आणि 'मुंबई सागा' हे गाजलेले चित्रपट आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.