आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्याचा मृत्यू:आर्या बॅनर्जीचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; अभिनेत्रीची आत्महत्या नाही, पोटात दोन लिटर अल्कोहोल सापडले, लिव्हर सिरॉसिस आजार होता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्या ही प्रसिद्ध सितारवादक दिवंगत पंडित निखिल बंदोपाध्याय यांची कन्या होती.

अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, आर्याचा मृत्यू जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने झाल्याचे उघड झाले आहे. डॉक्टरांनी तिच्या हत्येबद्दलचा संशय फेटाळून लावला आहे. तिच्या पोटात तब्बल दोन लिटर अल्कोहोल सापडले आहे. याशिवाय तिला लिव्हर सिरॉसिर हा आजारही होता, हेदेखील समोर आले आहे. शरीरावर मिळाले होते रक्ताचे डाग

कोलकाता पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, प्रख्यात सतारवादक निखिल बंद्योपाध्याय यांची मुलगी आर्या शुक्रवारी घरी मृतावस्थेत आढळली होती. शुक्रवारी सकाळी अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर ती मदत मागण्यासाठी जागेवरून उठली आणि पडली असावी. ते म्हणाले की, शवविच्छेदन तपासणीत असेही सांगण्यात आले की, तिच्या शरीरावर सापडलेले रक्त पडल्यानंतरच आले असावे. यामध्ये सर्वांत महत्वाचे म्हणजे आर्याच्या पोटात सुमारे दोन लिटर अल्कोहोल सापडले आहे. पोलिसांना तिच्या घरातून दारूच्या अनेक बाटल्या आणि रक्त लागलेले टिश्यू पेपर सापडले आहेत.

अनेक आजार होते
33 वर्षीय आर्या आजारी होती. तिला हृदयविकाराचा त्रास होता. शिवाय लिव्हर सिरॉसिस हा आजारही होता. आर्या कोलकाताच्या जोधपुर पार्क भागात एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. पोलिसांनी दरवाजा तोडून तिचा मृतदेह ताब्यात घेतला होता. आर्याने तिची खोली आतमधून बंद केली होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला आवाज दिले फोन केले मात्र, आतमधून कुठलाच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती.

आर्या तिच्या अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. तिला कुत्र्यांची खूप आवड होती. तिच्याकडे एक कुत्रा देखील होता. ती शेजा-यांच्या फारशी संपर्कात राहात नव्हती आणि कायम ऑनलाइन फूड ऑर्डर करायची. त्यामुळे पोलिस तिच्या घरी फूड डिलिव्हरी देणा-यासह गेल्या काही दिवसांत ज्या ज्या लोकांना ती भेटली होती, त्यांची चौकशी करत आहे.

'एलएसडी'मध्ये केले होते काम
आर्या ही प्रसिद्ध सितारवादक दिवंगत पंडित निखिल बंदोपाध्याय यांची कन्या होती. कोलकातामध्ये जन्मलेल्या आर्याने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. शास्त्रीय संगीतामध्ये तिने पदव्युत्तर पदवी घेतली होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘एलएसडी : लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2011 मध्ये तिने ‘द डर्टी पिक्चर’मध्येही काम केले होते. मुंबईत काही मॉडेलिंग प्रोजेक्ट्सही तिने केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser