आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय बॉक्स ऑफिसवर गाजतोय 'अवतार 2':अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, लवकरच 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेम्स कॅमेरुन यांचा 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा चित्रपटा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 2009 साली या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता 13 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट जगभरात धमाका करत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आपली जादू दाखवली आहे.

'अवतार 2'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 41 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 42-43 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर तिसऱ्या दिवशी रविवारी या चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल 136.45 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाच्या इंग्लिश वर्जनने 24 कोटींचा गल्ला जमवला आहे. हिंदी या चित्रपटाने 14 कोटी, तेलुगूत 4 कोटी, तामिळमध्ये 3 कोटी आणि मल्याळममध्ये 45 कोटींची कमाई केली आहे.

'अवतार 2'ची लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
'अवचार : द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. जगभरात हा चित्रपट 250 मिलिअन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींची कमाई करणार आहे.

2028 पर्यंत रिलीज होतील चित्रपटाचे आणखी 3 भाग
'अवतार 2' हा चित्रपट जेम्स कॅमेरुन यांनी दिग्दर्शित केला आहे. 250 मिलिअन डॉलरमध्ये या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील वर्षात या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अवतार 3' हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 पर्यंत प्रदर्शित होईल. त्यानंतर 18 डिसेंबर 2026 मध्ये चित्रपटाचा चौथा भाग आणि 22 डिसेंबर 2028 ला त्याचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • फक्त 1 मिनिटात मूव्ही रिव्ह्यू:उत्कृष्ट VFX, अंडरवॉटर सीन्सने परिपूर्ण 'अवतार', 3 तास 12 मिनिटेही वाटतील अपुरी

जेम्स कॅमेरॉन हे जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत, याची साक्ष त्यांचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट देतो. त्यांच्या मागील चित्रपटांप्रमाणेच यावेळीही कॅमेरॉन यांनी नेत्रदीपक अशी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. महामारीनंतर चित्रपट निर्माते सहसा त्यांच्या चित्रपटांमध्ये कुटुंब आणि कौटुंबिक मूल्यांना प्राधान्य देत आहेत. कॅमेरॉन यांनीदेखील त्यांच्या चित्रपटात तंत्रज्ञानाचा सुंदर वापर करत कुटुंब आणि या जगाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करुन दिली आहे. व्हिडिओत एका मिनिटात बघा रिव्ह्यू...

बातम्या आणखी आहेत...