आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेम्स कॅमेरॉन हे जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत, याची साक्ष त्यांचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट देतो. त्यांच्या मागील चित्रपटांप्रमाणेच यावेळीही कॅमेरॉन यांनी नेत्रदीपक अशी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. महामारीनंतर चित्रपट निर्माते सहसा त्यांच्या चित्रपटांमध्ये कुटुंब आणि कौटुंबिक मूल्यांना प्राधान्य देत आहेत. कॅमेरॉन यांनीदेखील त्यांच्या चित्रपटात तंत्रज्ञानाचा सुंदर वापर करत कुटुंब आणि या जगाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करुन दिली आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
अवतारच्या मागील भागातून चित्रपटाची कथा पुढे सरकते. खलाशी राहत असलेल्या पेंडोरावर पृथ्वीवरील मानव आणि शास्त्रज्ञांची वाईट नजर आहे. यावेळी, पृथ्वीवरील मानव आणि शास्त्रज्ञ केवळ पेंडोरामधील मौल्यवान खनिज अनऔबटॅनियम शोधत नाहीयेत, तर ते तेथील समुद्रात राहणाऱ्या व्हेल माशांच्या मेंदूतील एन्झाईम्सचाही शोध घेत आहेत, जे वयालाही मात देऊ शकतात. या मोहिमेसाठी स्टीफन लांगचे पात्र म्हणजेच कर्नल माईल्सला तयार केले जात आहे, ज्याचा पहिल्या भागात मृत्यू झाला होता. यावेळी, त्याच्या डीएनए आणि त्याच्या आठवणींच्या मदतीने, पृथ्वीवरील शास्त्रज्ञ त्याचा अवतार तयार करतात आणि तो पेंडोरा येथे पोहोचतो. तेथे त्याचे उद्दिष्ट पेंडोराला पकडणे आणि जॅक सुलीला मारणे हे असते.
पेंडोरावर त्याच्या आगमनापूर्वी, जॅक सली आणि नेयतिरीचे यांचे सुखी कुटुंब आहे. त्यांना स्वतःची दोन मुले आणि किरी ही एक दत्तक मुलगी आहे. त्यांचा एक मित्रही आहे जो कर्नल माईल्सचा मुलगा आहे. जॅकला धोक्याची जाणीव होते. यावेळी शत्रू आणखी शक्तिशाली आहे, म्हणून त्याचा सामना करण्याऐवजी, जॅक सली पाण्यात फिरणाऱ्या आणि दूर राहणाऱ्या प्रजातींपर्यंत पोहोचतो. अवतार 2 ची कथा या प्रजाती जॅक सलीला तेथे मदत करतात की नाही आणि कर्नल माईल्स तेथेही त्यांना शोधून काढतो की नाही याभोवती विणलेली आहे.
जॅक सली बरोबर आहे की नाही, किंवा त्याच्याकडे कोणते पर्याय आहेत? त्याचे कुटुंब नव्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकते की नाही यावरही जेम्स कॅमेरॉन यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन कसे आहे?
जेम्स कॅमेरॉन हे असे एक दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या कामावर कदाचितच शंका उपस्थित केली जाऊ शकते 192 मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांना लहान वाटतो. प्रेक्षकांना पुढे काय होणार हे बघण्याची उत्सुकता लागून राहते. तिसरा भाग जेम्स कॅमेरॉन आणणार आहेत, ज्यात जॅक सलीला आगीचा सामना करावा लागणार आहे, त्याबद्दलची उत्सुकताही खूप वाढली आहे.
चित्रपटाची नवीन कास्टिंग कशी आहे?
जेम्स कॅमेरॉन यांनी नवीन पात्रांची ओळख करून दिली आहे. जे जॅक सली आणि केट विन्सलेटची यांची मुले आहेत.
एक महत्त्वाचे पात्र म्हणजे व्हेल मासा ज्याचे नाव पायकन आहे. विस्तारवादी विचारसरणीच्या लोकांना, देशाला आणि राज्यकर्त्यांना आरसा दाखवणारे अनेक संदेशही या चित्रपटात आहेत. चित्रपटाची टॅगलाइन द वे ऑफ वॉटर ही न्याय्य आहे, ज्याचे भाषांतर मुळात 'द वे टू लीड लाइफ' असे होते. बहुतेक पालक आपल्या किशोरवयीन मुलांवर फारसा विश्वास ठेवण्यास सक्षम नसतात, तर काहीवेळा मुलांना त्यांचा हक्क मिळत नाही. येथे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी मुलांना मोठ्या गोष्टी करायला लावल्या आहेत. विशेषत: कठीण परिस्थितीत अचूक निर्णय घेण्याचे त्या मुलांचे गुण खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. हे सर्व प्रसंग दिग्दर्शकाने उत्कृष्ट VFX च्या मदतीने दाखवले आहेत, जे अप्रतिम आणि कल्पनेच्या पलीकडे आहेत.
नवीन जग आणि तंत्रज्ञानाची ओळख करुन देतो चित्रपट
तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट मैलाचा दगड आहे. पृथ्वीपासून काहीशे प्रकाशवर्षे दूर असलेले पेंडोराचे जग आपल्याला पडद्यावर अगदी नैसर्गिक वाटते. प्रख्यात डायव्हिंग इन्स्ट्रक्टर किर्क क्रर्क यांनी कलाकारांना पाण्याखाली डुबकी मारण्याचे प्रशिक्षण दिले. काहीही कृत्रिम आहे असे वाटत नाही. सायमन फ्रँग्लेनचे संगीत निसर्गाच्या आक्रमक स्वरूपाची जाणीव करून देते.
अभिनय कसा आहे?
सॅम वर्थिंग्टन, जोए साल्डाना, स्टीफन लांग, केट विन्सलेट आणि विशेषतः बाल कलाकारांसह चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांनी अप्रतिम काम केले आहे. चित्रपटाची लांबी आणि मुख्य मुद्द्याला उशीराने हात घालणे हीच एक उणीव जाणवते. अन्यथा हा चित्रपट सर्व प्रकारच्या गुणांनी सुसज्ज आहे. विशेषत: जोए साल्डाना पुन्हा एकदा तिची व्यक्तिरेखा जगली आहे. जेम्स यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या चित्रपटातील स्त्री पात्रांना अधिक सक्षम बनवतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.