आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या येणार सर्वात महागडा चित्रपट अवतार-2:आईने स्वप्नात पाहिली 12 फूट उंच निळ्या रंगाची मुलगी, जेम्स कॅमेरूनने यावरच लिहिली कथा

लेखक: अरुणिमा शुक्लाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात महागडा चित्रपट अवतार - द वे ऑफ वॉटर उद्या रिलीज होत आहे. हा चित्रपट 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 हजार कोटी रुपयांत तयार झाला आहे. विशेष म्हणजे अवतारची कल्पना एका स्वप्नातून आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या आई शर्ली यांना एक स्वप्न पडले होते. यात त्यांना 12 फुट उंचीची निळ्या रंगाची एक महिला दिसली होती. आईने या स्वप्नाबद्दल जेम्स यांना सांगितल्यावर त्यांना एका अशा ग्रहाची कल्पना सुचली ज्यावर निळ्या रंगाचे लोक राहतात. त्यांची उंची 10 ते 12 फुट असते. हा तो काळ होता जेव्हा जेम्स यांनी टायटॅनिकविषयी विचारही केला नव्हता.

यानंतर त्यांनी आधी टायटॅनिक तयार केला आणि त्याच्या 12 वर्षांनंतर अवतार हा चित्रपट आला. अवतारच्या 13 वर्षांनंतर याचा दुसरा भाग येतोय. अवतारच्या पूर्वी टायटॅनिक जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. नंतर 2009 मध्ये आलेल्या अवतारने हा विक्रम मोडला. फक्त टायटॅनिकच नव्हे तर जेम्स कॅमेरून यांनी चित्रपटांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले. त्यांचा पहिला चित्रपट टर्मिनेटर ते अवतार -2 पर्यंतची त्यांची कारकीर्द आणि चित्रपट बनवण्याची पद्धत आश्चर्यकारक आहे. मजेशीर गोष्ट ही आहे की जेम्स आपला चित्रपट लिहिल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचाही स्वतःच शोध लावतात.

सर्वात आधी नजर टाकूया जेम्स कॅमेरून यांच्या फिल्म स्ट्रॅटेजी, किस्से आणि त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डवर -

जेम्स कॅमेरून यांच्या फिल्मी ट्रॅक रेकॉर्डवर नजर टाकल्यास जगात सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट त्यांनीत बनवले आहेत.

चित्रपटासाठी वेगळ्या भाषेची निर्मिती

या चित्रपटासाठी कॅमेरून यांनी 2006 मध्ये कथेवर पुन्हा काम केले आणि चित्रपटात दाखवलेल्या एलियन्ससाठी नवी भाषा तयार केली. अमेरिकेतील भाषातज्ज्ञ डॉ. पॉल फ्रॉमर यांनी ही भाषा तयार केली. या भाषेसाठी 1000 शब्द तयार करण्यात आले होते. यात जेम्स कॅमेरून यांनी 30 शब्द टाकले होते. या चित्रपटासाठी कॅमेरून यांनी सेटअपही वेगळा केला होता.

आता नजर टाकूया जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांवर -

जगातील सर्वात महागडी फ्रँचायजी आहे अवतार

अॅनिमेशन, VFX आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला अवतार-2 250 मिलियन डॉलर म्हणजेच 2 हजार कोटींच्या बजेट खर्चातून तयार केला जात आहे. यासोबतच ही जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडी फ्रँचायजी ठरत आहे. याचे पूर्ण 5 भाग तयार करण्यासाठी 11 हजार 200 कोटी रुपये खर्च केले जातील. यासोबतच ही जगातील सर्वाधिक बजेटची फ्रँचायजी होईल.

जेम्स कॅमेरून याच्या 6-7 सीरिजही तयार करू शकतात. ते म्हणाले की हा निर्णय चित्रपटाची कमाई आणि प्रेक्षकांच्या मागणीवरून घेतला जाईल.

पाहा, कशी होती अवतारची रेकॉर्ड ब्रेक कमाई -

अवतार 2 वर नजर टाकल्यास चित्रपटाचे बजेट 2000 कोटी आहे. चित्रपटाने अॅडव्हान्स बूकिंगमध्येज बाजी मारली आहे. चित्रपटाची आतापर्यंत 4 लाख तिकिटे विकण्यात आली आहेत. असाही अंदाज लावला जात आहे की चित्रपट पहिल्या दिवशी जगभरात 180 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1400 कोटींची कमाई करेल. चित्रपट जगभरातील 52 हजार आणि भारतात 3 हजार स्क्रिन्सवर रिलीज केला जात आहे.

(ग्राफिक्स- कुणाल शर्मा)

Refrence-

https://www.statista.com/statistics/317408/highest-grossing-film-franchises-series/

https://www.statista.com/statistics/262926/box-office-revenue-of-the-most-successful-movies-of-all-time/

https://ohfact.com/interesting-facts-about-james-cameron/#:~:text=Wanted%20to%20make%20Avatar%20just,it%20for%20almost%2010%20years

https://www.cbc.ca/radio/q/blog/titanic-anniversary-20-fascinating-facts-about-the-epic-blockbuster-that-almost-sank-1.4381455

बातम्या आणखी आहेत...