आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अवरोध: द सीज विथइन:ज्ञात घटनेमागची अज्ञात कथा; भारताच्या सर्जिकल स्ट्राइकमागील समोर न आलेली कहाणी आता वेब सीरिजच्या रुपात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'अवरोध: द सीज विथइन’ हे या वेब सीरिजचे नाव असून 10 भागांची ही मालिका 31 जुलैपासून प्लॅटफॉर्मवर लाइव्ह केली जाणार आहे.

18 सप्टेंबर 2016 रोजी, कश्मीरमधील उरी येथे भारतीय भूदल तेव्हापर्यंतच्या सर्वांत भीषण हल्ल्याने हादरून गेले. त्यानंतर 10 दिवसांत हा हल्ल्याला उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली. ही घटना सर्वांना माहीत आहे पण या घटनेमागील योजना आणि भारतीय लष्कराने केलेल्या काटेकोर नियोजनाचे तपशील मात्र आजही समोर आलेले नाहीत. ही कथा प्रथमच उलगडून दाखवण्यासाठी सोनीलिवने या महत्त्वपू्र्ण घटनेचा सर्वांत अस्सल लेखाजोखा आपल्या 'अवरोध: द सीज विथइन' या पुढील ओरिजिनलमधून सर्वांपुढे आणला आहे.

राहुल सिंग आणि शिव अरूर यांचे प्रसिद्ध पुस्तक 'इंडियाज मोस्ट फीअरलेस’मधील 'वी डोण्ट रिअली नो फीअर’ या पहिल्या प्रकरणात बेतलेली आणि समर खान यांच्या इरादा एंटरटेन्मेंट एलएलपीने अप्लॉज एंटरटेन्मेंटसाठी निर्माण केलेली अवरोध ही मालिका एका गुप्त मोहिमेभोवती फिरते. अनेक महिने विस्तृत संशोधन केल्यानंतर आणि लष्करी अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर या घटनेकडे विविध कोनांतून बघणारी कथा आकाराला आली आहे. 'अवरोध'मधून प्रेक्षकांना घटनांचे अस्सल दर्शन खिळवून ठेवणा-या व मनोरंजक पद्धतीने मिळेल याची खात्री करण्यासाठी मालिकाकर्त्यांनी मालिकेवर दोन वर्षांहून अधिक काळ मेहनत केली आहे.

राज आचार्य यांनी दिग्दर्शित केलेल्या 'अवरोध'मध्ये अमित साधने मेजर टांगो ही भूमिका केली आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणा-या 35 वर्षीय अधिका-याच्या व्यक्तिमत्वाचे हे पडद्यावरील स्वरूप आहे. याशिवाय दर्शन कुमार, पवैल गुलाटी, नीरज कबी, मधुरिमा तुली, अनंत महादेवन, विक्रम गोखले आणि आरिफ झकेरिया हे कलावंत विविध भूमिका साकारत आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल अमित साध म्हणतो, "एखाद्या प्रतिकाचे स्वरूप प्राप्त झालेली आणि इतिहासात खोलवर रुजलेली व्यक्तिरेखा साकारण्यास मिळणे ही कलावंतासाठी खूपच सुखाची बाब आहे. अर्थात आपल्याहून खूप थोर अशा व्यक्तिमत्वाच्या अंतरंगात शिरण्याचे आव्हानही त्यात असते. म्हणूनच मेजर विदीप म्हणून जगणे आणि त्यातही भारतीय भूदलाच्या सर्वाधिक चर्चित मोहिमेचे नेतृत्व पडद्यावर साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. मला ही संधी मिळाली याबद्दल खूप आनंद वाटतो. मी या भूमिकेला न्याय देऊ शकलो असेन अशी आशाही वाटते. अवरोध हा आम्हा सर्वांसाठी खूपच विशेष अनुभव होता. याबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कधी एकदा जाणून घेतो असे आम्हाला झाले आहे.'