आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अवतार द वे ऑफ वॉटर'चा ट्रेलर रिलीज:पेंडोराचे सुंदर जग पुन्हा चित्रपटात दिसणार, 16 डिसेंबरला होणार प्रदर्शित

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

2009 मध्ये जेम्स कॅमेरुन यांच्या 'अवतार' या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. आता तब्बल 12 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे.. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' असे या चित्रपटाचे नाव असून निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. जेम्स कॅमेरुन प्रेक्षकांना पेंडोराच्या विलक्षण परंतु अॅक्शनने भरलेल्या जगात परत घेऊन जाण्यासाठी सज्ज आहेत. सली परिवाराच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, आणि इतरही बऱ्याच गोष्टींचा उलगडा या नवीन भागातून होणार आहे असे ट्रेलरमधून दिसत आहे. या अडचणींवर सली कुटुंब कशापद्धतीने मात करेल हेदेखील ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. चित्रपटाचे व्हीएफएक्स आणि पाण्याखालील सीनही खूप चांगले झाले आहेत. 'अवतार'चा सिक्वेल 16 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. इंग्रजीशिवाय हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. इतकेच नाही तर ‘अवतार’चे आणखीन तीन भाग येणार असल्याची चर्चा आहे. तिसरा भाग ‘अवतार : द सिड बेअरेर’ हा 2024 मध्ये प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे तर पुढचे 2 भाग 2026 आणि 2028 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...