आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयान मुखर्जीने शेअर केला 'ब्रह्मास्त्र'चा प्री-रिलीज प्रोमो:6 दिवसांपूर्वी सुरु झाली अ‍ॅडव्हान्स बुकिंग, 9 सप्टेंबरला रिलीज होणार चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने सोशल मीडियावर रिलीजपूर्वीचा प्रोमो शेअर केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी 6 दिवस बाकी असून तिकीट बुकिंग सुरू झाली आहे, असे अयानने सांगितले आहे.

अयान म्हणाला की, हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे यावर विश्वास बसत नाही. या चित्रपटाची थ्रीडी आवृत्ती आणखी खास असणार असल्याचे त्याने चाहत्यांना सांगितले आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच या चित्रपटाच्या टीमने हैदराबाद येथे चित्रपटाचे प्रमोशन केले. आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जोहर, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी, एसएस राजामौली आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमासाठी हैदराबादला पोहोचली होती. या प्रमोशनचे व्हिडिओदेखील व्हायरल होत आहेत.

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स सारंच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...