आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र पार्ट 2'वर अयान मुखर्जीची प्रतिक्रिया:म्हणाला - सुपरस्टार यशला देवच्या भूमिकेत पाहायला आवडेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रह्मास्त्र पार्ट 1 च्या यशानंतर अयान मुखर्जी चित्रपटाच्या पुढील भागासाठी चर्चेत आहे. ब्रह्मास्त्रच्या निर्मात्यांनी चित्रपटातील देवच्या भूमिकेसाठी साऊथचा सुपरस्टार यशशी संपर्क साधला असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर याआधी रणवीर सिंग किंवा हृतिक रोशन देवची भूमिका साकारू शकतात अशी अफवा पसरली होती. दरम्यान, अलीकडेच या अफवांवर चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीची प्रतिक्रिया समोर आली आहे. अयानने सांगितल्यानुसार, त्याला या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सुपरस्टार यशला कास्ट करायचे आहे. मात्र, त्याने नंतर त्याचे हे विधान खोडून काढले.

यशला देवच्या भूमिकेत बघू इच्छितो अयान
यशने 'ब्रह्मास्त्र 2' मध्ये देवची भूमिका साकारल्यास मला खूप आनंद होईल, असे अयानने इंडिया टुडेशी बोलताना म्हटले. मात्र, त्याने यशला कास्ट करण्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी करण जोहरने प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, यशसोबत ब्रह्मास्त्र 2 साठी अद्याप संपर्क करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत ब्रह्मास्त्र 2 मध्ये हृतिक, रणवीर किंवा यश यांच्यापैकी कोणाला फायनल करण्यात आले आहे हे सांगणे कठीण आहे.

अयान म्हणाला की, चित्रपटाचा पुढचा भाग डार्क असेल
इंडिया टुडेशी संवाद साधताना अयान म्हणाला, ब्रह्मास्त्र 2 शी संबंधित सर्वात मोठी अफवा ही होती की रणवीर सिंग या चित्रपटात देवची भूमिका साकारणार आहे. रणवीरशिवाय अनेक मोठ्या कलाकारांची नाव पुढे आली आहेत, मात्र मी यावर अजून काही बोलू इच्छित नाही.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अयान म्हणाला - ब्रह्मास्त्रचा पहिला भाग प्रेमकथेशी संबंधित होता. या चित्रपटाची थीम प्रेमावर आधारित होती. पण भाग 2 खूप वेगळा असणार आहे. या चित्रपटात देवची व्यक्तिरेखा डार्क असणार आहे. अशा परिस्थितीत कथाही खूप डार्क असेल. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशननेही या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती आणि ब्रह्मास्त्रच्या निर्मात्यांनी त्याच्याशी संपर्क साधला नसल्याचे सांगितले होते.

या चित्रपटाचा भाग-2 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे
ब्रह्मास्त्र चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अनेक प्रश्न अपूर्ण राहिले आहेत, जे निर्माते पुढील भागात उघड करतील. दिग्दर्शक अयान मुखर्जीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, हा चित्रपट 2025 पर्यंत प्रदर्शित होईल.

बातम्या आणखी आहेत...