आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीची मन की बात:'खिलाडी' फेम आयशा जुल्काने सांगितले चित्रपट सोडण्याचे कारण, म्हणाली - 'ग्लॅमर गर्ल होण्याचा कंटाळा आला'

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'खिलाडी', 'जो जीता वही सिकंदर' आणि 'मासूम' यांसारख्या चित्रपटांतून आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री आयशा जुल्का दीर्घ काळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. ती शेवटची 'जिनियस' या चित्रपटात दिसली होती. आता अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने चित्रपटसृष्टी सोडण्याचे कारण सांगितले आहे. चित्रपटात मिळणाऱ्या कामाबद्दल ती असमाधानी असल्याचे तिने सांगितले. चित्रपटात केवळ ग्लॅमर गर्ल म्हणून काम करायचे नव्हते, असे सुरुवातीपासूनच ठरवले असल्याचेही आयशाने सांगितले.

आयशाला सर्वाधिक प्रसिद्धी आमिर खान स्टारर 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातून मिळाली.
आयशाला सर्वाधिक प्रसिद्धी आमिर खान स्टारर 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातून मिळाली.

माझ्या योग्य काम नव्हते, म्हणून मी अभिनयापासून दुरावले
टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आयशाने सांगितले, 'चित्रपटांमध्ये तिच्या पात्रांची नावे वेगवेगळी होती, पण भूमिका मात्र एकाच धाटणीच्या होत्या.एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करताना त्यात काहीतरी खास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जेव्हा चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली, तेव्हाच हे घडू शकते. पण माझ्याबाबतीत असे घडत नव्हते. मला माझे टॅलेंट दाखवता येईल, असे कामच मला मिळत नव्हते, त्यामुळे मी अभिनयापासून दूर व्हायचा निर्णय घेतला,' असे आयशा म्हणाली.

आयशाने आमिर, सलमान आणि गोविंदा यांसारख्या बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम केले.
आयशाने आमिर, सलमान आणि गोविंदा यांसारख्या बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम केले.

मला ग्लॅमर गर्ल म्हणून नव्हे तर कलाकार म्हणून स्वतःचा ठसा उमटवायचा होता
'खिलाडी' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम केल्यानंतर आयशाला इंडस्ट्रीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवायचा होता. केवळ लूक्समुळे नव्हे तर अभिनयासाठी आपण ओळखले जावे, अशी तिची इच्छा होती.

आयशा पुढे म्हणाली, 'प्रत्येक अभिनेत्रीला अपग्रेड व्हायचे असते. मला माझ्या अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण करायची आहे ग्लॅमर गर्ल म्हणून नाही. पण इंडस्ट्रीत असे नाही. तिथे अभिनेत्रींकडून केवळ ग्लॅमरस दिसणे, नाचगाणी आणि नायकाशी रोमान्स करणे एवढीच अपेक्षा केली जाते. मला हे सर्व आवडले नाही, मला ज्या प्रकारचे काम मिळत होते त्यावर मी समाधानी नव्हते. म्हणून मी माझी एनर्जी इतर कामी खर्ची करण्याचा निर्णय घेतला.'

'खिलाडी' चित्रपटातील अक्षय आणि आयशाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती.
'खिलाडी' चित्रपटातील अक्षय आणि आयशाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती.

OTT प्लॅटफॉर्मवर केले आयशाने पदार्पण

अनेक कलाकारांप्रमाणे आयशानेही ओटीटी विश्वात हात आजमावला आहे. प्राइम व्हिडिओच्या 'हॅप्पी फॅमिली: कंडीशन अप्लाय' या शोमध्ये ती शेवटची दिसली होती. या शोमध्ये तिने रत्ना पाठक शाह, राज बब्बर आणि अतुल कुलकर्णी यांच्यासोबत काम केले. भविष्यात अनेक चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात असल्याचे आयशाने सांगितले आहे.

आयशा शेवटची ओटीटी मालिका हॅप्पी फॅमिली: कंडीशन्स अप्लायमध्ये दिसली होती.
आयशा शेवटची ओटीटी मालिका हॅप्पी फॅमिली: कंडीशन्स अप्लायमध्ये दिसली होती.