आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' या चित्रपटाला अयोध्येतील संत समाजाकडून विरोध होत आहे. ज्या चित्रपटगृहांमध्ये 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित होईल, ते जाळून टाका, असे वादग्रस्त विधान हनुमानगढीचे महंत राजुदास यांनी केले आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग...' या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. गाण्यात शाहरुख आणि दीपिकाचे बोल्ड सीन्सदेखील आहेत. भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने वादंग उठले आहे.
महंत राजुदास म्हणाले, 'बॉलिवूड-हॉलिवूड सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे सनातन धर्म आणि संस्कृतीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असतात. हिंदू देवतांचा अवमान केला जातो. पठाण चित्रपटात ज्या प्रकारे भगवा, संतांचा रंग, राष्ट्राचा रंग, देशाचा रंग, सनातन संस्कृतीचा रंग यांचा अपमान करण्यात आला आहे, हे खूप दुःखदायक आहे,' असे ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, 'शाहरुखने सनातम धर्म संस्कृतीची एकदा नव्हे तर अनेक वेळा खिल्ली उडवली आहे. आता दीपिकाला भगव्या रंगाची बिकिनी घालून लोकांच्या श्रद्धा दुखावण्याची काय गरज होती. मी प्रेक्षकांना अशा चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो. ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवला जाईल, ते जाळून टाका. असे न केल्यास ते ताळ्यावर येणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही दुष्टांशी वाईट वर्तन करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,' असे विधान त्यांनी केले आहे.
आग्रा येथे हिंदू महासभेने म्हटले - हा सीन हटवला नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही
आग्रा येथील हिंदू संघटनांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. बोल्ड सीन न हटवल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. महासभेचे सरचिटणीस अवतार सिंग गिल यांनी हे हिंदूंच्या भावना जाणूनबुजून दुखावणारे असल्याचे म्हटले आहे. सेन्सॉर बोर्डाने परवानगी का दिली असा त्यांचा सवाल आहे. भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतीक आहे. संपूर्ण आग्र्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
शाहरुखचे वैष्णोदेवी दर्शन हा पब्लिसिटी स्टंट
संघटनेच्या ब्रज महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना दिवाकर म्हणाल्या, दीपिकाने याआधीही देशद्रोह्यांना पाठिंबा दिला आहे. शाहरुख खानही आमच्या धर्माचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करत आहे. त्याची वैष्णोदेवीची यात्रा केवळ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी होती, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रयागराजमध्येही 'पठाण'चा निषेध, पोस्टर जाळले, म्हणाले- अपमान सहन केला जाणार नाही
'पठाण' चित्रपटाच्या निषेधार्थ बुधवारी प्रयागराजमध्ये शाहरुख आणि दीपिकाचे पोस्टर जाळण्यात आले. मुठीगंज चौकात पोस्टर जाळल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी 'पठाण' चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केल्याचा आरोप केला. भाजप नेते राजेश केसरवानी म्हणाले की, 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात भगव्या रंगासह अश्लीलतेचा वापर हा संपूर्ण हिंदू संस्कृतीचा अपमान आहे, जो कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.
गृहमंत्र्यांनीही गाणे आक्षेपार्ह असल्याचे म्हटले
मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि राज्य सरकारचे प्रवक्ते नरोत्तम मिश्रा यांनी दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला. ‘या चूका सुधाराव्यात’ अशी मागणीही त्यांनी शाहरुखचे नाव घेऊन केली. गाण्यातील काही दृश्ये योग्य नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकार हा चित्रपट राज्यात प्रदर्शित करायचा की नाही याबद्दल विचार करेल असेही मिश्रा यांनी म्हटले.
‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यामध्ये निर्मात्यांनी बदल करणे आवश्यक आहे. नाही तर चित्रपटाचे प्रदर्शन मध्य प्रदेशात होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ, असे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे.
इंदूर शहरातही एका संघटनेने निदर्शने केली. तसेच शाहरुख-दीपिकाचे पुतळे जाळले. इंदूरच्या माळवा मिल चौकात वीर शिवाजी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी 'बेशरम रंग' या गाण्याला विरोध दर्शवत शाहरुख-दीपिकाचे पुतळे जाळले. या गाण्यातील आशयामुळे हिंदूंचा अपमान झाला असून भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणा-या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
ऑल इंडिया मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीचा (एआयएमटीसी )ही या चित्रपटाला विरोध
एआयएमटीसीचे अध्यक्ष पीरजादा खुर्रम मियाँ चिश्ती म्हणाले की, 24 तासांत त्यांना देशभरातून 400 हून अधिक कॉल आले. अनेकांनी घरी येऊन पठाण हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे सांगितले.
दोन दिवसांत गाण्याला 3 कोटी 20 लाख व्ह्यूज
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या या गाण्याला दोन दिवसांत 3 कोटी 20 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात दीपिकाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. त्यांच्या डान्स मूव्हजही बोल्ड आहेत. शाहरुखचा डॅशिंग लूकही पाहायला मिळत आहे. या गाण्याला शिल्पा रावने आवाज दिला आहे, तर विशाल-शेखरने ते संगीतबद्ध केले आहे. हे गाणे वैभवी मर्चंटने कोरिओग्राफ केले आहे. रिलीज झाल्यापासून हे गाणे अनेक अर्थाने चर्चेत आहे.
'पठाण' 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तो हिंदीसोबतच दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका आणि शाहरुखसोबत जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. जॉन खलनायक बनला आहे. या चित्रपटाचा टिझर महिनाभरापूर्वी रिलीज झाला होता. अनेकांना तो आवडला नाही. सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. युजर्सच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'वॉर' आणि 'मार्व्हल्स'ची कॉपी आहे.
किंग खान शाहरुख आणि दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यावरुन वाद निर्माण झाला असून इंदूर शहरात एका संघटनेने निदर्शने केली. तसेच शाहरुख-दीपिकाचे पुतळे जाळले. वाचा सविस्तर...
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आगामी पठाण हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाले आणि वादाला तोंड फुटले. या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन हे वादंग उठले आहे. पण दीपिकाने या गाण्यामध्ये परिधान केलेली बिकिनी कुणी डिझाइन केली हे आता समोर आले आहे. कोण आहे ही डिझायनर जाणून घ्या...
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. बुधवारी त्याचा टीझर रिलीज करण्यात आला. त्याचे पहिले गाणे 'बेशरम रंग...' देखील रिलीज झाले आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने अतिशय हॉट आणि बोल्ड सीन्स दिले आहेत. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे, त्यामुळे चित्रपटाला विरोध केला जात आहे. वाचा सविस्तर...
दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. चाहते हे गाणे खूप एन्जॉय करत आहेत. मात्र, आता हे गाणे मूळ नसून कॉपी असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. सोशल मीडियावर काही ट्रोलर्स या गाण्याची तुलना फ्रेंच गायक झैनच्या 'मकिबा' गाण्याशी करत आहेत. 'मकिबा' या गाण्यातून 'बेशरम रंग'चे बॅकग्राउंट बीट चोरण्यात आल्याचे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.