आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:कतरिना-विक्कीच्या लग्नाचं आमंत्रण न मिळाल्याबद्दल आयुष म्हणाला- ही काही मोठी गोष्ट नाही, सगळ्यांनीच ती मोठी केली आहे

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही सर्व आनंदी आहोत कारण ती आनंदी आहे

बॉलिवूडमधील करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून कतरिना कैफ सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या जवळ आहे. कतरिनाने तिच्या लग्नात सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना निमंत्रण दिले नव्हते. आता एका मुलाखतीत सलमानचा मेहुणा आयुष शर्मा म्हणाला, "लग्नाला आमंत्रित न करणे ही मोठी गोष्ट नाही."

आम्ही सर्व आनंदी आहोत कारण ती आनंदी आहे
मुलाखतीत आयुष म्हणाला, 'कतरिना आमची प्रिय मैत्रीण आहे आणि आम्ही सर्व तिला शुभेच्छा देतो. जर तिने लग्नाचे आमंत्रण दिले नाही तर ती मोठी गोष्ट नाही. पण या गोष्टीला सगळ्यांनी मोठे केले. कतरिना आणि विकीसाठी तो खूप मोठा दिवस होता आणि त्यांना तो दिवस चांगला घालवायचा होता.'

आयुष पुढे म्हणाला, कतरिना एक कुटुंब म्हणून नेहमीच आमच्या जवळ असेल. ती आनंदी आहे म्हणून आम्ही सर्व आनंदी आहोत.'

9 डिसेंबर रोजी विकी-कॅटचे झाले ​​लग्न
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी एक महिन्यापूर्वी म्हणजेच 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्न केले. दोघे 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. विकी-कॅटने त्यांच्या लग्नात नो फोन पॉलिसी लागू केली होती. या लग्नाला बॉलिवूडचे मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. या यादीत फराह खान, करण जोहर, नेहा धुपिया, अंगद बेदी आणि कबीर खान यांचा समावेश होता.

कतरिनाचे वर्कफ्रंट

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत 'फोन भूत'मध्ये दिसणार आहे.

विकीचे वर्कफ्रंट
विकीबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो इंदूरमध्ये सारा अली खानसोबत त्याचा आगामी चित्रपट 'प्रॉडक्शन नंबर 25' ची शूटिंग करत आहे. याशिवाय विकी लवकरच 'गोविंदा नाम मेरा', 'द ग्रेट इंडियन फॅमिली' आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या पुढील अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...