आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग प्रोजेक्ट:भोपाळमध्ये 2 जुलैपासून ‘डॉक्टर जी’चे शूटिंग सुरू करणार आयुष्मान-रकुल, कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे दोन महिने झाला उशीर

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 16 दिवसांचे असेल शेड्युल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बहुतांश चित्रपटाच्या शूटिंगला उशीर झाला आहे. या यादीत आयुष्मान खुराणा आणि रकुल प्रीत सिंग यांचा अभिनय असलेल्या 'डॉक्टर जी' चित्रपटाच्या नावाचादेखील समावेश आहे. शूटिंगला दोन महिने उशीर झाल्यानंतर आता निर्माते पुन्हा शूटिंग सुरू करणार आहेत. याचे चित्रीकरण 2 जुलैपासून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये होणार आहे. चित्रपटासाठी भोपाळ आणि अलाहाबादचे लोकेशन निवडण्यात आले आहे. चित्रपटाशी जोडलेल्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली.

  • 250 ऐवजी 120 क्रू मेंबर्सच येतील

चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीमशी जोडलेल्या लोकांनी सांगितले, भोपाळमध्ये आयुष्मानच्या पात्राचे घर आणि त्याच्या दवाखान्याचा काही चित्रीत केला जाणार आहे. खरंतर,मध्य प्रदेशात क्रू मेंबर्सच्या संख्यावर काही बंधने नाहीत. तरीदेखील निर्माते मुंबईवरुन 250 च्या एेवजी 120 क्रू मेंबर्स घेऊन येणार आहेत.

  • रकुलने नुकतेच सुरू केले शूटिंग

रकुलदेखील 2 जुलैपासून शूटिंग सुरू करणार की नाही कन्फर्म नाही. तिने दोन दिवस झाले एका दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. मात्र तो ‘मे-डे’ किंवा 'थँक गॉड’ आहे की नाही याविषयी तिने सांगितले नाही. ‘डॉक्टर जी’ साठी जुलैमध्ये वेळ असेल की नाही कन्फर्म नाही.

  • 1 जुलैपासून मुंबईत डे-नाइटच्या शूटिंगची परवानगी मिळेल

दुसरीकडे मुंबईदेखील जुलैपासून शूटिंगसाठी पूर्ण उघडणार आहे. 1 जुलैपासून तेथे दिवसाबरोबरच रात्रीदेखील शूटिंग सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. याविषयी दिग्दर्शक आणि निर्माते शमास सिद्दीकी ‌म्हणाले, जुलैपासून शूटिंगवर लागलेली बंदी काढण्यात येणार आहे. आता मुंबईत फक्त 5 वाजेपर्यंत शूटिंग करण्याची परवानगी होती. त्यामुळे आम्ही 1 जुलैपासून ‘बोले चूड़ियां’ शूटिंग सुरू करणार आहोत. याचे फक्त 2 ते 3 दिवसाचे शूटिंग राहिले.

  • भोपाळनंतर अलाहाबादला जाणार टीम

18 जुलैनंतर टीम अलहाबादला रवाना होणार आहे. अलाहाबादमध्ये मेडिकल कॉलेजच्या लाइव्ह लोकेशनवर शूटिंग केली जाणार होती आता प्रॉडक्शन टीमने दोन इमारती निवडल्या आहेत. त्यांना मेडिकल कॉलेजसारखे बनवले जात आहे. या कॉलेजमध्येच मेडिकल कॉलेजच्या वाचन-लिखाणाचे दृश्य चित्रित केले जाणार आहे.

  • आधी इंदूरची लोकेशन केली होती निश्चित

यासाठी तांत्रिक रेकी इंदूरमध्ये झाली हाेती. तेथे प्राॅपर्टीदेखील टीमला आवडली होती. मात्र जेव्हा याचे शूटिंग ठरलेल्या वेळेच्या दोन महिन्यानंतर होणार आहे. त्यामुळे याचे शूटिंग भोपाळमध्ये होणार आहे. तेथे जवळजवळ दोन ते अडीच आठवड्याचे चित्रीकरण केल्यानंतर टीम अलाहाबादला वळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...