आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाउंसमेंट ऑफ द डे:आयुष्मान खुराणा आणि रकुल प्रीत सिंग स्टारर 'डॉक्टर जी' 17 जून 2022 रोजी थिएटरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'डॉक्टर जी' चित्रपटाच्या थिएट्रीकल प्रदर्शनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे.

'बधाई दो' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केल्यानंतर आता जंगली पिक्चर्सने त्यांच्या आगामी 'डॉक्टर जी' या चित्रपटाच्या रिलीज डेटवरुनही पडदा उचलला आहे. आयुष्मान खुराणा, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह यांचा बहुप्रतिक्षित 'डॉक्टर जी' हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 17 जून 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कॅम्पस कॉमेडी ड्रामामध्ये रकुल आणि अभिनेत्री शेफाली शाह यांच्यासोबत आयुष्मान पहिल्यांदाच स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे

'बरेली की बर्फी' (2017) आणि 'बधाई हो' (2018) या दोन यशस्वी सहकार्यानंतर, आयुष्मान आणि जंगली पिक्चर्स हे दोघे बॉक्स ऑफिसवर हॅटट्रिक करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.

जंगली पिक्चर्सच्या अमृता पांडे म्हणाल्या की, “चित्रपटाचे लेखक सुमित, सौरभ आणि विशाल यांनी अनुभूतीसह ‘डॉक्टर जी’ची एक अप्रतिम स्क्रिप्ट तयार केली असून अनुभूतीने ती पुढच्या स्तरावर नेली आहे. पुढच्या वर्षी 17 जूनला हा चित्रपट चित्रपटगृहात आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारी अनुभूती कश्यप म्हणते की, “चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर, आम्ही आता चित्रपटगृहांमध्ये येण्यासाठी सज्ज झालो आहोत. आयुष्मान, रकुल, शेफाली, जंगली आणि माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या ‘डॉक्टर जी’ च्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे आणि ते पडद्यावर दिसून येईल. तो एक समृद्ध करणारा अनुभव आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

बातम्या आणखी आहेत...