आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला माहित आहे:अशोक वाटिकामध्ये सीतेबरोबर दिसलेल्या त्रिजटा आहेत अभिनेता आयुष्मान खुराणाच्या सासूबाई, नाव आहे अनिता कश्यप 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रामायण'मध्ये अनिता कश्यप यांनी त्रिजटाची भूमिका साकारली होती.

लॉकडाऊनमध्ये 'रामायण' मालिकेचे पुन्हा प्रसारण करणे फायदेशीर सिद्ध होत आहे, कारण टीआरपी चार्टमध्ये या मालिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. ही पौराणिक मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवर प्रसारित होत असल्याने, केवळ जुनीच नव्हे तर नवीन पिढी देखील याचा आनंद घेत आहे. या मालिकेशी संबंधित अशा बर्‍याच गोष्टीही समोर येत आहेत, ज्याची माहिती फारच कमी लोकांना असेल. आजचा सुपरस्टार असलेल्या आयुष्मान खुराणाचेदेखील या मालिकेशी कनेक्शन आहे. या मालिकेत त्याच्या सासूबाई अनिता कश्यप यांनी त्रिजटाची भूमिका साकारली होती.

त्रिजटा रावणाची विश्वासू होती आणि जेव्हा रावणाने सीतेला अशोक वाटिकामध्ये आणले तेव्हा तिच्यावर लक्ष ठेवण्याची आणि तिची देखभाल करण्याची जबाबदारी त्रिजटावरच होती. त्रिजटा सुरुवातीला सीतेच्या विरोधात होती, परंतु नंतर तिने सीतेला स्वतःची मुलगी मानले होते. सध्या अनिता चंदीगडमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची मुलगी ताहिरा कश्यप ही आयुष्मान खुराणाची पत्नी आहे. 

बातम्या आणखी आहेत...