आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सामाजिक विषयाची कायम जाण असलेला अभिनेता आयुष्यान खुराणा देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी दररोज आपला जीव धोक्यात घालणा-या पोलिसांवर होणा-या हिंसाचाराच्या घटनांमुळे खूप काळजीत पडला आहे.
सोशल मीडियावर निषेध: हिंसाचाराच्या अशा घटनांचा निषेध करण्यासाठी आयुष्मान खुराणाने सोशल मीडियाचा वापर केला आहे. तो म्हणतो, "देशभरातील पोलिस आणि सुरक्षा कर्मचार्यांवर झालेल्या हल्ल्याबद्दल मला फार वाईट वाटले. आम्हाला, आमची कुटुंबे आणि आपल्या मित्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण पोलिस दल रोजच आपला जीव धोक्यात घालत आहे आणि त्यांच्यावरील हल्ल्यांचा मी निषेध करतो."
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) April 14, 2020
गेल्या काही दिवसांत पोलिसांवर अत्याचाराची बरीच प्रकरणे घडली आहेत, जसे की पटियाला येथे ड्यूटीवर असणारा पोलिस लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखतो, त्याचा हात कापला जातो, तसेच इंदूर, कटक आणि अहमदाबादमधील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. कोविड -19 च्या साथीच्या आजारापासून देशाला वाचवण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या पोलिस दलाच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे आवाहन आयुष्मानने देशातील प्रत्येक नागरिकाला केले आहे. तो म्हणतो, "ते आपल्याला आणि आपले जीवन वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. म्हणूनच आपण त्यांचा आदर केला पाहिजे कारण ते आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी लढत आहेत. प्रत्येक भारतीयांनी पोलिस दलाचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांना सलाम केला पाहिजा! जय हिंद!"
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.