आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Ayushmann Khurrana Shares First Look Of Doctor G, Ab Hogi Shooting, Says I Am Proud To Play The Role Of A Doctor For The First Time In My Career

फर्स्ट लूक आउट:'डॉक्टर जी'मधील आयुष्मान खुराणाचा 'फर्स्ट लुक', अभिनेता म्हणाला - स्क्रीनवर पहिल्यांदाच डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारण्याचा आनंद होतोय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटातील आयुष्मानच्या पात्राचे नाव डॉ. उदय गुप्ता आहे.

अभिनेता आयुष्मान खुराणा सध्या भोपाळ येथे आपल्या आगामी 'डॉक्टर जी' या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. हा चित्रपट जंगली पिक्चर्स प्रोडक्शनचा असून यात आयुष्मानसह रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच या चित्रपटातील आयुष्मानचा 'फर्स्ट लुक' समोर आला आहे. आयुष्मानने देखील चित्रपटातील फर्स्ट लुक सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटात तो डॉक्टरची भूमिका निभावणार आहे. चित्रपटातील आयुष्मानच्या पात्राचे नाव डॉ. उदय गुप्ता आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला, ''डॉक्टर जी'चा विषय माझ्या खूप जवळचा आहे. लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करत, आम्ही सर्वजण चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याची वाट बघत होतो, आणि आम्हाला याचा आनंद आहे की अखेरीस तो दिवस उगवला."

आयुष्यमान पुढे म्हणाला, "स्क्रीनवर पहिल्यांदाच एका डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चित्रीकरणासाठी खरोखरच खूप उत्साहित आहे, कारण यामुळे मला पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याची आणि होस्टेल लाइफ जगण्याची आणि त्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे.'

आयुष्मान आणि रकुल पहिल्यांदाच एकत्र
आयुष्मान आणि रकुल पहिल्यांदाच 'डॉक्टर जी'च्या निमित्ताने एकत्र येत आहेत. अनुभूती कश्यप दिग्दर्शित या चित्रपटाची कथा सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ यांनी लिहिली असून हा एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे, ज्यामध्ये मुख्य पात्र डॉक्टरांच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

आयुष्मानच्या 'बधाई हो'ला मिळाले होते दोन राष्ट्रीय पुरस्कार
'बरेली की बर्फी' आणि 'बधाई हो' सारख्या दोन यशस्वी चित्रपटांनंतर 'डॉक्टर जी' हा जंगली पिक्चर्ससोबत आयुष्मानचा तिसरा चित्रपट आहे. 'बरेली की बर्फी' हा चित्रपट 2017 मध्ये आला होता. तर 'बधाई हो' 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. 'बधाई हो' या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. तर 'बरेली की बर्फी'ला समीक्षकांसह प्रेक्षकांची दाद मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...