आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या दुस-या लाटेचे साइड इफेक्ट:आयुष्मान खुराणाच्या ‘डॉक्टर जी’चे MP आणि UP मध्ये होणारे शूटिंग पुढे ढकलले, इंदूरमध्ये होणार होते 20-25 दिवस चित्रीकरण

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंदूर, भोपाळ आणि अलाहाबादमध्येही होणार होेते नियोजित चित्रपटांचे शूटिंग
  • अभिनेत्री कृती खरवंदा असणार मुख्य भूमिकेत
  • महिनाभर लाेकेशनच्या शोधात होती टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे. कारगिल आणि मनालीसारखे भाग सोडले तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंडसह प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरांत निर्मात्यांना आपल्या चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले आहे. आता या यादीत आयुष्मान खुराणाच्या ‘डॉक्टर जी’चाही समावेश झाला आहे. हा चित्रपट मध्य एप्रिलपासून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात शूट होणार होता. मात्र तसे होऊ शकले नाही. चित्रपटाच्या सूत्रानुसार, या चित्रपटात आतापर्यंत रकुल प्रीत सिंहलाच घेण्यात आले होते. आता यात कृती खरवंदालाही घेण्यात आल्याची बातमी आहे.

  • इंदूरमध्ये घराचे आणि उत्तर प्रदेशात रुग्णालयाचे शूटिंग

इंदूरमध्ये घराचा भाग आणि उत्तर प्रदेशात रुग्णालयाचे शूटिंग होणार होते. यासाठी दिग्दर्शक अनुभूती कश्यपच्या टीमने इंदूरच्या सात डझनपेक्षा जास्त घरांचा शोध घेतला होता. कथेत त्या घराचेही महत्त्व आहे, जेथे मुख्य पात्र राहते. पूर्ण घटनाक्रम घर आणि रुग्णालयामध्ये चालतो. चित्रपटातील मुख्य पात्राच्या घराचे शूटिंग इंदूर आणि रुगणालयाच्या भागाचे शूटिंग उत्तर प्रदेशात होणार होते. तेथे अलाहाबादमध्ये रुग्णालयाचे सीन चित्रित करणार होते. मात्र कोरोनामुळे सर्वच परिस्थिती बदलली आहे. आता एखाद्या स्टुडिओलाच रुग्णालयाचे रूप देण्यात येईल.

  • इंदूरमध्ये कृतीसोबत 20-25 दिवसांचे शूटिंग करणार होता आयुष्मान

शूटिंग संचालक हर्ष देवने सांगितले, “आमची पूर्ण तयारी झाली होती. इंदूरमध्ये 20 ते 25 दिवसांचे शूटिंग होणार होते. त्यानंतर भोपाळ आणि शेवटी अलाहाबादमध्ये शूटिंगचा विचार होता. संबंधित विभागाकडून शूटिंगची परवानगीदेखील मिळाली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रॉडक्शन हाऊसने शूटिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी आयुष्मान खुराणा आणि कृती खरवंदा इंदूरला जाणार होते. तेथे मुख्य पात्राचे घर आणि कुटुंबातील पात्राचे शूटिंग होणार होते.

  • रकुल किंवा कृतीसाेबत हाेणार आयुष्मानचे रोमांटिक अँगल शूट

दिग्दर्शक अनुभूती कश्यप आणि त्यांची टीम मागील डिसेंबरपासूनच लाेकेशनचा शोध आणि प्री-प्रॉडक्शनवर काम करत होती. 15 एप्रिलपासून शूटिंग सुरू करणार होते, मात्र आता शूटिंग कधी सुरू होणार याचे उत्तर कुणाकडेच नाही.दुसरीकडे चित्रपटात कृती खरबंदा असणार की नाही यावर कुणीही अधिकृत माहिती दिली नाही. स्वत: कृतीनेदेखील या विषयावर मौन बाळगले आहे. आयुष्मान खुराणाचा रकुल प्रीत सिंह आणि कृतीपैकी कुणासोबत रोमँटिक अँगल राहील हे पाहणे रंजक ठरेल.

बातम्या आणखी आहेत...