आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑक्टोबर महिन्यात तीन मोठ्या कलाकारांचे चित्रपट ऑन द फ्लोअर येणार आहे. यात अक्षय कुमार लंडनमध्ये 'बेलबॉट'मचे पुढील शेड्युल शूट करणार आहे. तर सलमान खान गांधी जयंतीच्या दिवसापासून ‘राधे’चे पॅच वर्क पूर्ण करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईहून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत होणार आहे. तिसरे नाव आयुष्मान खुराणाचे आहे, जो आपल्या मुळ गावी म्हणजेच चंदीगडमधून काळ काम करत आहे.
आयुष्मानबद्दल बोलले जात होते की, तो गांधी जयंतीपासून अभिषेक कपूरच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल. पण तसे नाहीये. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 16 ऑक्टोबरपासून या चित्रपटाची शूटिंग सुरू होईल, जी बरेच दिवस चालेल. चंदीगड आणि आसपासच्या भागात शूटिंग करुन ते डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.
नोव्हेंबरपासून वाणी कपूर शूटिंगमध्ये सहभागी होणार
अभिषेक कपूरच्या या चित्रपटात आयुष्मानसोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण नोव्हेंबरपासूनच ती शूटिंगमध्ये सामील होऊ शकेल. कारण ती सध्या 'बेलबॉटम'च्या शूटमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे आयुष्मानच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन वर्षांपर्यंत त्याच्या तारखा ब्लॉक आहेत. त्याने आणखी सहा निर्मात्यांना तारखा दिल्या आहेत.
अनुभव सिन्हासोबत पुढचा चित्रपट करणार आहे
अभिषेक कपूरच्या चित्रपटानंतर आयुष्मान लगेच अनुभव सिन्हा यांच्यासमवेत त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. त्यानंतर लवकरच तो अमर कौशिकचा चित्रपट पूर्ण करेल. अनुभवसोबत तो पुन्हा एकदा कॉपच्या भूमिकेत दिसेल. मात्र हा चित्रपट 'आर्टिकल 15' चा सिक्वेल नसेल. अमर कौशिकसोबत तो आणखी एक कॉमेडी फिल्म करणार आहे.
'बेलबॉटम' पूर्ण करून परतणार वाणी
दुसरीकडे लंडनमधून वाणी म्हणाली, ''अभिषेक कपूर दिग्दर्शित या पुरोगामी प्रेमकथेत आयुष्मानसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. माझी इंडस्ट्री पुन्हा कामावर परतत असल्याचा मला आनंद आहे. मी देखील 'बेलबॉटम' पूर्ण करून त्यांच्यासोबत काम सुरु करेल. सध्या शूटिंगमध्ये खूप मज्जा येत आहे. हा अनुभव विलक्षण होता. कोरोना साथीचे आव्हान असूनही टीमने सुरक्षित वातावरण कायम राखले. मोठ्या क्रूबरोबरही सुरक्षित शूट केले, याचे श्रेय प्रॉडक्शन टीमला जाते.''
शाहिद आणि जॉनसुद्धा शुटिंगला सुरुवात करणार आहेत
ऑक्टोबरमध्ये चित्रीकरणावर परतणा-या सेलिब्रिटींमध्ये शाहिद कपूर आणि जॉन अब्राहम यांच्याही नावांचा समावेश आहे. शाहिद कपूर उद्यापासून 'जर्सी' चित्रपटाच्या चित्रीकरणाला देहरादूनमध्ये सुरुवात करणार आहे. तेथे त्याचे वडील पंकज कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील सामील होतील. जॉन अब्राहम मुंबईत 'मुंबई सागा' चे शूट पूर्ण करणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.