आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:चित्रपटसृष्टीतून आणखी एक वाईट बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे झाले निधन 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केआर सच्चिदानंदन उर्फ सॅची यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला.

चित्रपटसृष्टीतून अजून एक वाईट बातमी आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक केआर सच्चिदानंदन यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे गुरुवारी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 48 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. केआर सच्चिदानंदन हे मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सॅची या नावाने ओळखले जायचे. ‘अय्यपनम कोशियुम’ या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सच्चिदानंद गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. 16 जून रोजी त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने केरळमधील त्रिसूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल   मीडियाच्या माध्यमातून सच्चिदानंदन यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेता दुलकर सलमानने त्यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली असून एक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेता पृथ्वी सुकुमारनसोबत त्यांनी ‘अय्यपनम कोशियुम’ चित्रपटाची निर्मिती केला. या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपटात पृथ्वी सुकुमारनसोबत बाजू मेननची महत्त्वाची भूमिका होती. सॅची यांनी अनारकली या मल्याळम चित्रपटातून डेब्यू केला होता. 

बातम्या आणखी आहेत...