आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध गायक आणि संगीतकार बी प्राक आणि त्याची पत्नी मीरा बच्चन यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या बाळाचे जन्मानंतर लगेचच निधन झाले आहे. बी प्राक आणि मीर यांचे हे दुसरे अपत्य होते. दोघेही त्यांच्या दुस-या बाळाच्या आगमनासाठी खूप उत्सुक होते. गेल्या 4 एप्रिल 2022 ला ब्री प्राकने तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
बुधवारी मीराने आपल्या दुस-या बाळाला जन्म दिला, मात्र जन्मानंतर काही तासांतच त्यांच्या नवजात बाळाची प्राणज्योत मालवली. बाळाच्या निधनाची माहिती देताना प्राकने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.
आम्हाला याक्षणी एकांताची गरज आहे
पोस्ट शेअर करताना प्राक म्हणाला, "मला अतिशय दुःखी, वेदनादायी मनाने हे सांगावे लागतेय की, आमच्या नवजात बाळाचा जन्मानंतर काही तासांतच मृत्यू झाला. आईबाबा म्हणून आम्ही सर्वात वेदनादायी परिस्थितीतून जात आहोत. आमच्या बाळासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला आधार दिला. बाळाच्या मृत्यूमुळे आम्ही कोलमडलो आहोत. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला याक्षणी एकांताची गरज आहे”, असे बी प्राक याने म्हटले आहे.
'तेरी मिट्टी' या गाण्याद्वारे मिळाली ओळख
बी प्राक आणि मीरा यांनी 4 एप्रिल 2019 रोजी चंदीगडमध्ये लग्न केले होते. वर्षभरानंतर दोघेही एका गोंडस बाळाचे आईबाबा झाले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'अदब' असे ठेवले. प्राकने काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्या मुलाच्या आगमनाची माहिती दिली होती. 'केसरी' चित्रपटातील 'तेरी मिट्टी' या गाण्याद्वारे प्राकला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. याशिवाय त्याने अनेक पंजाबी गाणी गायली आणि संगीतबद्ध केली आहेत. नुकतेच त्याचे 'तुम इश्क नहीं करते' हे गाणे रिलीज झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.