आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोड बातमी:'बाहुबली' फेम अभिनेता राणा डग्गुबतीचा मिहिका बजाजसोबत साखरपुडा, भावी पत्नीसोबत दिसला रोमँटिक अंदाजात  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साखरपुड्याला मिहिका पारंपरिक वेशभूषेत अतिशय सुंदर दिसली. राणाने या खास दिवशी पांढरा शर्ट आणि मुंडू परिधान केला होता.

'बाहुबली' या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. मिहिका बजाज हे राणाच्या भावी पत्नीचे नाव आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हैदराबाद येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाल्याचे समजते. 

राणाने 12 मे रोजी इंस्टाग्रामवर पहिल्यांदा मिहिकासोबतचा फोटो शेअर करुन 'तिने होकार दिला आहे', अशी रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दोघे लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता 20 मे रोजी साखरपुडा करुन हे दोघे ऑफिशिअली एंगेज्ड झाले आहेत. राणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर साखरपुड्याचे दोन फोटो शेअर करुन 'And it’s official!!', असे ट्विट केले आहे.

तर मिहिकानेही इंस्टाग्रामवर या खास दिवसाचे फोटो शेअर करुन 'My happy place!', हे कॅप्शन दिले आहे. 

View this post on Instagram

My happy place! 🥰🥰 @ranadaggubati

A post shared by miheeka (@miheeka) on May 21, 2020 at 12:03am PDT

साखरपुड्याला मिहिका पारंपरिक वेशभूषेत अतिशय सुंदर दिसली. राणाने या खास दिवशी पांढरा शर्ट आणि मुंडू परिधान केला होता. राणाचे वडील  सुरेश बाबू यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, राणाचं लग्न हिवाळ्यात करण्यात येणार आहे. या लग्नाची तयारीसुद्धा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मिहिका ही बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची अतिशय जवळची मैत्रीण आहे. सोनमच्या लग्नात मिहिकाने उपस्थिती लावली होती. राणा आणि मिहिकाने त्यांच्या नात्याची कबुली दिल्यानंतर सोनमने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. 

राणाने दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केले आहे. 2011 मध्ये त्याने 'दम मारो दम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो 'हाऊसफूल 4', 'द गाझी अटॅक' आणि 'बेबी' या चित्रपटांमध्ये झळकला. 

मिहिकाने इंटेरिअर डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती लंडनला उच्च शिक्षणासाठी गेली. 2017 मध्ये तिने स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापित केली. ‘ड्यू ड्रॉप डिझाइन स्टुडिओ’ असे तिच्या कंपनीचे नाव आहे. 

बातम्या आणखी आहेत...