आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इंटरव्ह्यू:‘बाहुबली’ फेम राम्या कृष्णनने केले कंगना रनोटचे कौतुक, म्हणाली - ‘कंगना एक अद्भुत, धाडसी आणि स्वावलंबी महिला आहे’

किरण जैन. मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोट अभिनित ‘जयललिता’ यांची बायोपिक ‘थलाइवी’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री राम्या कृष्णन मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘क्वीन’ वेब सिरीजमुळे चर्चेत होती. ही सिरीज तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची बायोपिक आहे, असे म्हटले जाते. आता ही वादग्रस्त सिरीज लवकरच टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे. यासंदर्भात राम्याने दिव्य मराठीसोबत चर्चा केली...

राम्याला ज्यावेळी समजले की, कंगना रनोट अभिनित ‘जयललिता’ यांची बायोपिक ‘थलाइवी’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे, तर ती म्हणाली, ‘आत्मचरित्रावर काम सुरू आहे आणि ही प्रेरणादायी गोष्ट सांगण्यासाठी लोकांनी तिची निवड केली, हे ऐकून आनंद झाला. कंगना एक धाडसी, अद‌्भूत आणि स्वावलंबी महिला आहे. खरं तर मला तिचे खूप कौतुक आहे आणि माझ्या मते ती एक राणी आहे. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि ती चित्रपटात चांगले काम करेल, अशी अपेक्षा आहे.’

  • ‘क्वीन’ सीझन 2 च्या स्क्रिप्टवर सुरू झाले काम

‘क्वीन’ सीझन 2 बाबत राम्या म्हणाली, 'सेटवर परत जाण्यासाठी आणि याचा भाग होण्यासाठी मी अक्षरश: दिवस माेजत आहे, मी खूप उत्सुक आहे. सीझन 2 मध्ये आपण आणखी मनोरंजक संकल्पना आणि उत्कृष्ट अॅक्शनची अपेक्षा करू शकतो. याच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाले आहे.’

  • स्वत:साठी पहिल्यांदाच एवढा वेळ मिळाला असेल..

सर्वांप्रमाणेच राम्यादेखील लॉकडाऊन काळात आपल्या घरातून बाहेर पडली नाही. तिच्या आयुष्यात आलेल्या या दीर्घ सुटीचा ती खूप आनंद घेत आहे. ती म्हणते, ‘न जाणे कितीतरी वर्षांपासून सतत काम करत आहे. सेट आणि घराची एक दिनचर्या झाली होती. मला तर आठवतही नाही की, आयुष्यात मला माझ्या स्वत:साठी इतका वेळ कधी मिळाला होता.‘

0