आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबलीच्या मनाचा मोठेपणा:प्रभासने तेलंगाना सीएम रिलीफ फंडाला दिली दीड कोटी रुपयांची देणगी, हैदराबादच्या पावसामुळे 37 हजार लोक झालेत प्रभावित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी त्याने पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर कोविड रिलीफ फंडाला एक कोटी रुपयांची देणगी दिली होती.

बाहुबली फेम अभिनेता प्रभास पुन्हा एकदा देवदूत म्हणून पुढे आला आहे. प्रभासने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तेलंगाना सीएम रिलीफ फंडाला दीड कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने 37 हजारांहून अधिक कुटुंबे प्रभावित झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महानगरपालिका कर्मचारी पुन्हा जनजीवन सामान्य करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.

प्रभास कायम मदतीसाठी पुढे येतो
प्रभासच्या या उदात्त कार्याची माहिती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित पीआरओ बीए राजू यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. तथापि, मदतीसाठी पुढे येण्याची प्रभासची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही, त्याने पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर कोविड रिलीफ फंडाला एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. प्रभासपूर्वी महेश बाबू, ज्युनिअर एनटीआर, चिरंजीवी यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सीएम रिलीफ फंडामध्ये देणगी दिली आहे.

हे आहेत प्रभासचे वर्किंग लाइनअप
23 ऑक्टोबर रोजी वयाच्या 42 व्या वर्षात पदार्पण करत असलेला प्रभास सध्या इटलीमध्ये असून आपल्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये नाग अश्विन यांचा अद्याप नाव न ठरलेला चित्रपट, ओम राऊतचा आदिपुरुष आणि राधा कृष्ण कुमार यांच्या राधे श्याम या चित्रपटाचा समावेश आहे. राधे श्याममधील प्रभासच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव विक्रमादित्य असून त्याचे नवीन पोस्टर प्रसिद्ध झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...